नांदेड , जयवर्धन भोसीकर :
महाविकास आघाडी मधुन काँग्रेस तर्फे देगलूर बिलोली राखीव मतदार संघातून उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेले भोसी तालुका बिलोली येथील ॲडव्होकेट लक्ष्मण देवकरे भोसीकर माजी न्यायाधीश हे त्यांच्याच गावातून जनसंपर्क यात्रा सुरू केली केली, काँग्रेस कडून ते इच्छुक उमेदवार आहेत.
भोसी या त्यांच्या मूळ गावातून त्यांनी गाठी भेटी घेवून जनसंपर्क यात्रा सुरू केली आहे.
त्यावेळी गावातील माजी सरपंच सटवाजी कोंदापुरे , माजी सरपंच विठ्ठलराव रामलोड, सध्याचे सरपंच दयानंद गायकवाड गावातील नागरिक शंकरराव हाळे, विनोद दत्ता निदानपुरे, पिराजी विठ्ठल करोड,रामराव देवकरे,श्याम देवकरे , सामाजिक कार्यकर्ते दिगंबरराव मोरे,ॲड अशोक देवकरे, ॲड महेबुब इत्यादी उपस्थित होते.तसेच कुंडलवाडी, बिलोली सह अनेक गावात त्यांनी भेटी दिल्या.चांगला प्रतिसाद त्यांच्या जनसंपर्क यात्रेला भेटत आहे.
No comments:
Post a Comment