नांदेड, जयवर्धन भोसीकर :
महाकवी वामनदादा कर्डक यांचा १९वा आणि आंबेडकरी कवी गायक प्रतापसिंग बोदडे यांचा संयुक्त जयंती सोहळा आज दि.२४ ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना "तुफानातले दिवे" हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असून नामवंत गायकांचा गीत गायन कार्यक्रम या प्रसंगी ऐकावंयास मिळणार आहे.
शहरातील कुसुम सभागृहामध्ये दुपारी ४ वाजता होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फारूक अहमद राहणार आहेत. या जयंती सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते एम. सायलू अण्णा म्हैसेकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष इंजी. प्रशांत इंगोले, मुख्य संयोजक संजय निवडंगे आणि निमंत्रक डॉ. विजय कांबळे यांनी दिली आहे.
'स्टार प्रवाह फेम' अंजली गडपाळे या कार्यक्रमाचे आकर्षण राहणार आहे. महाराष्ट्रातील ख्यातकीर्त गायक
नागसेन दादा सावदेकर, प्रा. किशोर वाघ, मेघानंद जाधव, कुणाल वराळे, अशोक निकाळजे, चंद्रकांत प्रल्हाद शिंदे, सचिन भुईगळ, सपना ताई खरात, अजय देहाडे, धम्मानंद शिरसाट, रविराज भद्रे, गौतम पवार, माधव वाढवे, उत्तम वाडेकर, यांच्यासह अनेक दिग्गज कलावंत सहभागी होत आहेत.
संयुक्त जयंती सोहळ्याच्या औचित्याने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी तुफानातले दिवे सामाजिकता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. श्याम दवणे, सागर दादा पाईकराव, गंगाधर लव्हाळे, सुरेश गजभारे, देविदास मनोहरे, सय्यद इकबाल कैसर, भगवान गायकवाड, जयलिंगू वाघमारे, 'राजाभाऊ शिरसाठ, भोगाजी तंगाने, सतीश कावडे आणि भारतीबाई सदावर्ते आदींची या पुरस्कारासाठी निवड केली. पत्रकारिता पुरस्कार : पत्रकारिता पुरस्कारही घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये संजय कदम, बाबुराव पाटील, मुक्तेश्वर रामराव पाटील (उपसंपादक, दैनिक प्रजावाणी, नांदेड), उद्धव बळीराम सरोदे आणि महेंद्र गायकवाड (नांदेड) आदींचा समावेश आहे.
No comments:
Post a Comment