किनवट : विषय : एस.सी. / एस.टी. आरक्षणात क्रिमिलेयर लावून व वर्गीकरण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या निषेधार्थ भीम आर्मीच्या वतीने दि. 21 ऑगस्ट रोजी पकारलेल्या भारत बंद मध्ये भीम आर्मी किनवट तालुका व शहर शाखेने भारत बंद आंदोलनात सहभागी होवून आंदोलन यशस्वी केले. किनवट येथे सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालयात नायब तहसिलदार मुंडे यांच्या मार्फत देशाचे महामहिम राष्ट्रपती यांना या संदर्भात निवेदना पाठविण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, दि. 1 ऑगस्ट 2024 रोजी मा. सर्वोच्च न्यायालयाने एस.सी./ एस.टी. आरक्षणात क्रिमिलेयर लावून व वर्गीकरण करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. हा उच्च न्यायालयाचा निकाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाच्या विरूध्द आहे. यासाठी भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष तथा नगीना लोकसभा मतदारसंघाचे खासदार अॅड. चंद्रशेखर आजाद यांनी दि. 21 ऑगस्ट 2024 रोजी भारत बंदची हाक दिली. या हाकेला प्रतिसाद देत दि.21 ऑगस्टच्या भारत बंद आंदोलनात भीम आर्मी किनवट तालुका व शहर शाखेने आपला सहभाग नोंदविला. खा. अॅड. चंद्रशेखर आजाद यांच्या आदेशानुसार देशातील सर्वच जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी धरणे आंदोलन करून निवेदन देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या निवेदनातील मागण्या पुढील प्रमाणे 1) जातीवर आधारित जनगणना करण्यात यावी, 2) सर्व विभागामध्ये अनुसूचित जाती व जमाती तथा इतर मागास प्रवर्गातील आरक्षण कोटा पूर्ण करण्यात यावा. 3) अशासकीय संस्थांमध्येही आरक्षण प्रणाली लागू करण्यात यावी. 4) जो पर्यंत सर्व विभागांमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागास प्रवर्गाचा आरक्षण कोटा पूर्ण होत नाही तो पर्यंत आरक्षणाची ही तरतूद संविधानाच्या नवव्या अनुसूचिमध्ये समाविष्ट करण्यात यावे. जेणे करून आरक्षणाच्या तरतूदीमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करता येणार नाही.
सर्वोच्च न्यालयाने दिलेला निकाल अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या हिताचा नसून तो असंवैधानिक आहे व तो अनुसूचित जाती जमातीसाठी घातक असल्याने भीम आर्मी तालका किनवट व शहर शाखेने भारत बंद आंदोलनात आपला यशस्वी सहभाग नोंदविला. निवेदनावर तालुकाध्यक्ष सिध्दांत खोब्रागडे, उपाध्यक्ष शिलरत्न पाटील, सचिव शेंदूपान मुनेश्वर, कार्याध्यक्ष निवेदक कानिंदे, सोशल मिडीया प्रमुख अरूण शेंद्रे, यांचेसह अभय नगराळे, राहूल उमरे, शरण लोखंडे यांचेसह अनेकांच्या स्वाक्ष-या आहेत.
No comments:
Post a Comment