पेसा क्षेत्रात रुजू होवून काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 23 August 2024

पेसा क्षेत्रात रुजू होवून काम न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

किनवट,दि.22(प्रतिनिधी) :  विविध ठिकाणांहून बदली झाल्यानंतर पेसातंर्गत असलेल्या किनवट - माहूरमध्ये रुजू होऊन नंतर सोयीनुसार प्रतिनियुक्तीवर गेलेल्या सात कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ.संध्या राठोड यांनी केली आहे.                                          


            या संदर्भात नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांना दिलेल्या निवेदनात सौ.राठोड म्हणाल्या की, पेसातंर्गत किनवट - माहूर तालुक्यात ज्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या; ते  सात कर्मचारी बदलीनंतर किनवट,माहूरमध्ये रुजू झाले. त्यानंतर मात्र त्या कर्मचाऱ्यांनी नांदेड व इतर सोयीच्या ठिकाणी प्रतिनियुक्ती करून घेतली. पेसा अंतर्गत पगार घेऊन कर्मचारी प्रतिनियुक्तीवर गेल्याने दुर्गम भागाच्या वाडी, तांड्यातील ग्रामस्थांच्या कामांचा खोळंबा होत आहे. बदलीनंतर रुजू झालेले कर्मचारी येथे काम करण्यास टाळाटाळ करीत आहेत ही बाब गंभीर असून, त्या कर्मचाऱ्यांसह त्यांना प्रतिनियुक्ती देणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी संध्या राठोड यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Pages