देगलूर, बिलोली,कुंडलवाडीत लाडकी बहिण योजना मार्गदर्शन शिबिर संपन्न तथा शिवसेना शिंदे गट आढावा बैठक संपन्न. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 22 August 2024

देगलूर, बिलोली,कुंडलवाडीत लाडकी बहिण योजना मार्गदर्शन शिबिर संपन्न तथा शिवसेना शिंदे गट आढावा बैठक संपन्न.

देगलुर :

   शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शहरातील लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यासाठी मार्गदर्शन शिबिर दिनांक 21 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आले होते.

            महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी असलेली लाडकी बहिण योजना हि संपूर्ण राज्यात राबविली जात आहे,याच अनुषंगाने देगलूर,बिलोली,कुंडलवाडी शहरातील महिलांसाठी हि योजना राबविण्यात आली असून या योजनेतून अनेक लाडक्या बहिणींना अनुदान मिळाले आहे तर ज्यांनी अद्याप या योजनेत अर्ज केला नाही त्यांनी 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे.या योजनेतील अनुदान मिळालेल्या लाभार्थ्यांच्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

"मंगेश कदम हे पक्ष वाढीसाठी चांगले काम करत असल्यामुळे देगलूर बिलोली विधानसभेची उमेदवारी त्यांना द्यावी म्हणून आम्ही मुख्यमंत्र्याकडे शिफारस करणार.

संजय काळे- नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख "


"देगलूर बिलोली विधानसभेची उमेदवारी शिवसेनेला व पक्ष वाढीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच मिळणार.

जिल्हाप्रमुख- उमेश मुंडे."

   यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देगलूर, नायगाव, मुखेड विधानसभेचे संपर्कप्रमुख संजय काळे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष उमेश मुंडे, एससी एसटी ओबीसी जिल्हाप्रमुख मंगेश कदम, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वनमाला ताई राठोड, युवा सेना जिल्हाप्रमुख ओमप्रकाश धुपेकर, शिवसेना तालुकाप्रमुख बाबाराव रोकडे, उमाकांत बादेवाड, अरविंद पवनकर,आदी उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुंडलवाडी देगलूर बिलोली येथील हजारो शिव सैनिकांनी मेहनत घेतली , व महिला मंडळीने पदाधिकारी यांना राखी बाधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे  आभार मानले.या शिबिराला शहरातील महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment

Pages