छ. संभाजीनगर दि.१६ शासनाच्या विविध योजनेत दलालांची संख्या वाढली असून कामगारानी आपल्या न्याय हक्कासाठी शोषणाविरुद्ध लढा उभारावा,कामगारांना हक्कापासून वंचित ठेवणाऱ्यांना धडा शिकवावा असा सूर रिपब्लिकन कामगार सेनेच्यावतीने मुकुंदवाडी येथे आयोजित महिला मेळाव्यात उमटला या वेळी सुमारे 870 कामगारांना कामगार उपायुक्त कार्यालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या गृहोपयोगी वस्तूंच्या संचाचे वितरण करण्यात आले.
कामगार कार्यालयाबाहेर कायम दलालांचा वावर असतो कामगारांच्या अशिक्षितपणा चा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणात कामगारांची आर्थिक पिळवणूक केली जात असून यावर अंकुश नसल्याने या शोषणाविरुद्ध हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
रिपब्लिकन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष धम्मपाल भुजबळ यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते.
रिपब्लिकन सेनेचे प्रदेश सदस्य चंद्रकांत रुपेकर यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले तर सचिन निकम यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा संपन्न झाला.
रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने 2000 बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली असून लवकरच कामगार कार्यालयातील दलालांचा सुळसुळाट, विविध योजनांची निष्क्रियता या विरुद्ध कामगार उपायुक्त कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सचिन निकम यांनी दिली त्यास कामगारांनी नोंदणी प्रमाणपत्र उंचावून प्रतिसाद दिला.
यावेळी प्रा.सिद्धोधन मोरे,काकासाहेब गायकवाड, अस्कर खान, मनिषाताई साळुंखे, शेख शकील, विकास हिवराळे, शैलेंद्र म्हस्के, दिपक जाधव, विनोद वाकोडे, साईराज गवळे आदींची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश रगडे, मंगेश भुजबळ, अनमोल सवई, बाबासाहेब दाभाडे, अशोक दाणेकर, संजय गायकवाड, संजय मोकाशे, असजद खान, अतिष रुपेकर, भीमराव भुजबळ, संभाजी थोरात, आक्षय वाघमारे, विशाल साळुंखे, राहुल थोरात, अनील खोतकरआदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment