१२ दिवसांपासून BANRF-२०२२ च्या संशोधक विद्यार्थ्यांचे १०० टक्के आधिछात्रवृत्तीसाठीचे सुरू असलेले आमरण उपोषण मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसोबतच्या निमंत्रणाने स्थगित - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 17 August 2024

१२ दिवसांपासून BANRF-२०२२ च्या संशोधक विद्यार्थ्यांचे १०० टक्के आधिछात्रवृत्तीसाठीचे सुरू असलेले आमरण उपोषण मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसोबतच्या निमंत्रणाने स्थगित

पुणे:   डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे येथे मागील १२ दिवसांपासून BANRF २०२२ च्या संशोधक विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण व आंदोलन सुरू होते. विद्यार्थ्यांची मागणी होती की,युजीसीने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे  १०० टक्के आधिछात्रवृत्ती प्रवेश दिनांकापासून बार्टीने  द्यावी  तसेच ३० ऑक्टोबर २०२३ व २५ जुलै २०२४  हे दोन्हीही शासन निर्णय बार्टीच्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांवर लादण्यात येवू नये या मागण्या घेऊन मागील १२ दिवसांपासून सुरू असणारे बेमुदत आमरण उपोषण मुख्यमंत्री कार्यालयाकडून निर्णायक  बैठकीसाठी शिष्टमंडळाला शासकीय निमंत्रण पत्राद्वारे कळवल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपल्या उपोषणास स्थगिती दिली.

          या आंदोलना दरम्यान ७६३ विद्यार्थ्यांनी बार्टीने जाहीर केलेल्या  ५० टक्के आधिछात्रवृत्तीचा विरोध केला. तसेच बार्टी कार्यालयाने कागदपत्रे पडताळणीवर ७ ऑगस्ट रोजी एकमताने बहिष्कार टाकला. त्यानंतर ८ तारखेला संविधान दुगाने या संशोधक विद्यार्थ्यांने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. तर १२ रोजी बार्टी कार्यालयाला टाळे बंद आंदोलन छेडण्याचा आले होते. यावेळी शहरातील विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष,यांनी सहभाग नोंदवून परिसर दनाणुन सोडला तर दिनांक १४ रोजी अर्धनग्न व मुंडन आंदोलन झाले.या दरम्यान उपोषणकर्त्याचे आरोग्य खालावत जात होते. अशातच मुख्यमंत्र्यांनी महासंचालकाच्या फोनद्वारे आंदोलनाचे नेते हर्षवर्धन दवणे व पल्लवी गायकवाड यांच्याशी संवाद साधला असून आंदोलनकर्त्याच्या मागण्या ऐकून व समजून घेतल्या.यापूर्वी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे यांच्याशीही शिष्टमंडळाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक ठरली असून २३ तारखीची मुख्यमंत्र्यांची बैठक निर्णायक ठरणार असल्याने विद्यार्थी नेते हर्षवर्धन दवणे,पल्लवी गायकवाड,स्वप्निल नरबाग,प्रकाश दिपके, प्रा.सतीश वागरे,संविधान दुगाने,समींदर घोकसे,प्रदीप महेंदकर,राहुल चव्हाण ,मनोहर सोनकांबळे, जयवर्धन गच्चे,अनुपम सोनाळे,मारोती बरमे,सोनाली खोब्रागडे, प्रज्ञा उके, बाळासाहेब रोहणेकर,अंकित राऊत,सचिन पवळे,अमर भोगे,यांनी या आंदोलनात महत्वाची भूमिका पार पाडली असून पुणे शहरातील अनेक विद्यार्थी युवा, सामजिक संघटना व राजकीय पक्षांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.



No comments:

Post a Comment

Pages