शहापूर येथील महादेव मंदिरात मंगेश कदम यांच्यावतीने आज महाप्रसादाचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 18 August 2024

शहापूर येथील महादेव मंदिरात मंगेश कदम यांच्यावतीने आज महाप्रसादाचे आयोजन


नांदेड ,जयवर्धन भोसीकर: 

देगलूर तालुक्यातील शहापूर येथील राचना महादेव मंदिरात श्रावण मास निमित्त शिवसेना एससी एसटी ओबीसी विभागाचे जिल्हाप्रमुख मंगेश कदम यांच्या वतीने महाप्रसादाचे आज सोमवारी दुपारी 1ते5 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख उमेश मुंडे , युवा जिल्हाप्रमुख कृष्णा धुपेकर ,महिला उपजिल्हाप्रमुख सविताताई चप्पलवार , माजी तालुकाप्रमुख घाळप्पा आंबेसंगे, देगलूर शिवसेना तालुकाप्रमुख गंगाधर तमलुरकर ,शहरप्रमुख व्यंकट पुरमवार, बिलोली तालुकाप्रमुख बाबाराव रोकडे, बिलोली शहरप्रमुख श्रीकांत गादगे, बिलोली तालुका संघटक अमित  पेंटे,शहर संघटक रमेश पवनकर , महिला तालुकाप्रमुख अर्चना शिंदे, उप तालुका प्रमुख मारुती पाटील, नरवाडे, उमाकांत बादेवाड, कुंडलवाडी शहर प्रमुख लक्ष्मण गंगोने, कुंडलवाडी शहर संघटक महंमद इस्माईल, युवा तालुकाप्रमुख अरविंद पवनकर, कुंडलवाडी युवा शहर प्रमुख गंगाधर शिंदे, देगलूर तालुकाप्रमुख प्रकाश गोने पाटील,देगलूर एसी तालुकाप्रमुख सिद्धार्थ बळेगावकर देगलूर सोशल मीडिया तालुकाप्रमुख दिगंबर जाधव, बिलोली एसटी शहर प्रमुख सुजित भास्करे,बिलोली एसी शहर प्रमुख बुद्धम जाधव,मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाचे शिवाजी हेळगुंडेव मुख्यमंत्री जनकल्याण  सोमनाथ,देगलूर बिलोली विधानसभा समन्वयक डॉ बन्सीधर गिरी, डॉ संजय बेंद्रीकर, डॉ मारुती कांबळे यांच्यासहित अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून या महाप्रसादाचा जास्तीत जास्त भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीचे प्रमुख शिवसेना देगलूर ओबीसी तालुकाप्रमुख अमोल स्वामी, संतोष रेड्डी भूपतवार, चंद्रशेखर सुरकुंटे, राम सुरकुंटे, जगत पुलागोर, अमोल चिंतलवार, नामदेव ईलतपवार, कपिल यनगुलवार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages