बहुजन समाज पक्षाच्या नांदेड जिल्हा कार्यकारणी विधानसभेच्या कार्यकारणीची निवड - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 19 August 2024

बहुजन समाज पक्षाच्या नांदेड जिल्हा कार्यकारणी विधानसभेच्या कार्यकारणीची निवड

नांदेड, जयवर्धन भोसीकर : 

बहुजन समाज पार्टी जिल्हा नांदेड च्या वतीने बहुजन समाज पक्षाचे प्रदेश अध्यक्ष म सुनील डोंगरे  यांच्या आदेशान्वे बहुजन समाज पार्टीचे नांदेड जिल्हा कार्यालय छत्रपती चौक नांदेड या ठिकाणी नांदेड जिल्हा कार्यकारणी व नांदेड जिल्ह्यामधील विधानसभेच्या कार्यकारणीची निवड करण्यात आली. सदरील बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश सदस्य तथा नांदेड जिल्हा व हिंगोली जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक  विठ्ठलराव घोडके, महाराष्ट्र प्रदेश सदस्य व नांदेड जिल्हा प्रभारी  राहुल कोकरे, नांदेड जिल्ह्याचे प्रभारी  विकी वाघमारे, जिल्हा प्रभारी सुनील डोंगरे, बहुजन समाज पार्टीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष  साहेबरावजी डाकोरे, यांच्या वतीने नांदेड जिल्हा व जिल्ह्यातील विधानसभा कार्यकारणीची. खालील प्रमाणे निवड करण्यात आली. 

 श्रीकांत नागणीकर-नांदेड जिल्हा उपाध्यक्ष तथा नांदेड दक्षिण विधानसभा प्रभारी,  प्रदीप  कसबे-नांदेड शहराध्यक्ष, लक्ष्मीकांत सुंदर गिरवार- जिल्हा कार्यकारणी सदस्य,  सुरेश जोंधळे-बी व्ही एफ जिल्हा संयोजक,  लक्ष्मण वायवळे-जिल्हा सचिव तथा नांदेड उत्तर विधानसभा प्रभारी,  धम्मपाल गच्चे-नांदेड उत्तर विधानसभा अध्यक्ष,  शिवराज कांबळे-उत्तर विधानसभा उपाध्यक्ष,  लक्ष्मण वानखेडे-उत्तर विधानसभा महासचिव,  जय कुंटे,-जिल्हा सचिव तथा नांदेड दक्षिण विधानसभा प्रभारी,  बाबू गाना बीजे-गोला गोलेवार समाज भाई चारा जिल्हा अध्यक्ष, या सर्वांची निवड करण्यात आली व पुढील भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. सदरील बैठकीमध्ये बसपाचे नारायण वाघमारे, मारुती गायकवाड, लक्ष्मीकांत सुंदर गिरवार, भीमराव जाधव, एडवोकेट जे पी सोमवंशी, माधव वाघमारे, ज्ञानेश्वर महापुरे, एडवोकेट एस एस नागोरे, प्रदीप कसबे, शिवराज कांबळे, माधव कंधारे, श्रीकांत नागरिक, जिल्हा सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख सुशील सोनवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages