नांदेड:
डॉ. नरेंद्र दाभोलकर हे पेशाने डॉक्टर होते, चांगला चालणारा आपला दवाखाना बंद करून पूर्णवेळ अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करू लागले. लोकांना शहाणं करू लागले. यासाठी त्यांनी मोठं संघटन उभं केलं. त्यांचं हे काम शोषण व्यवस्था आहे तशी कायम राहावी असा विचार करणाऱ्या लोकांच्या हितसंबंधाच्या आड येणार होत, अशा लोकांकडून त्यांचा खून करण्यात आला. माणूस मारला जातो परंतु त्याचे विचार मारता येत नाहीत. त्यांच्यानंतरही त्यांनी सुरू केलेले काम जोमाने चालूच आहे. विद्यार्थ्यांना संबोधित करताना, दाभोलकरांचा वारसा पुढे चालवणे हे आपले कर्तव्य आहे असं असं प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या भाषा संकुलाचे संचालक डॉ. दिलीप चव्हाण यांनी केले.
अंधश्रद्धा निर्मूलन समिती नांदेड व विल्स कोचिंग क्लासेस नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने "डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे विचार घरोघरी" या थीम अंतर्गत यांच्या अकराव्या स्मृतिदिनानी आयोजित केलेल्या 'वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' या कार्यक्रमच्या प्रसंगी, डॉ. दिलीप चव्हाण यांच्या हस्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर लिखित पंधरा पुस्तकांचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंनिस चे राज्य कार्यकारी समिती सदस्य सम्राट हटकर यांनी केले. विज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या जवळपास चाळीस संघटनांच संघटन असलेल्या ऑल इंडिया पीपल सायन्स नेटवर्क या संघटनेने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन, 20 ऑगस्ट, त्यांच्या स्मृती इत्यार्थ वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून दरवर्षी साजरा करायचे ठरवले अस ते प्रास्ताविकत म्हणाले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर अजय गव्हाणे हे उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ. विकास वाठोरे, प्राध्यापक साईकिरण सलगरे, प्राध्यापक महेश टेकाळे, अंनिस नांदेडचे कार्याध्यक्ष भगवान चंद्रे, सचिव रवी देशमाने, बुवाबाजी संघर्ष कार्यवाह उषा गैनवाड, मानस मित्र विभाग कार्यवाह डॉ. सारिका शिंदे, विविध उपक्रम कार्यवाह कपिल वाठोरे यांचे सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment