नांदेड : मुदखेड येथे ५ ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृहात भीम आर्मीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला भीम आर्मी राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे, महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुनील गायकवाड तसेच मरा'वाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी भीम आर्मी भारत एकता पदनियुक्ती कार्यक्रम पार पडला. यात नांदेड उत्तर जिल्हा अध्यक्षपदी किरण सदावर्ते यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी आजाद समाज पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अशोक वायवळे व आजाद समाज पार्टी युवा जिल्हा अध्यक्ष योगेश सोनाळे व भीम आर्मी उमरी , मुदखेड व धर्माबाद तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित होते मुदखेड आणि उमरी तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.
No comments:
Post a Comment