नांदेड :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडुन "हर घर तिरंगा" ही मोहिम सुरु करण्यात आली होती. सदर मोहिम लोकांना तिरंगा घरी आणण्यासाठी आणि भारताच्या स्वातंत्र्याची ओळख म्हणुन तो फडकवण्यासाठी प्रोत्साहित करते. लोकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करुन भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरुकता निर्माण करते. याच अभियानाचा भाग म्हणुन महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार "हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा" या अभियाना अंतर्गत महापालिकेच्या वतीने दिनांक ०९.०८.२०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता हडको बस स्टॉप पासुन तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी रॅलीची सुरुवात होणाऱ्या हडको बस स्टॉप या ठिकाणी महापालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी एकत्र येऊन तिरंगा प्रतिज्ञेचे वाचन केले. उपस्थितांना अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी तिरंगा प्रतिज्ञा देऊन राष्ट्रध्वजास समर्पित मोटारसाईकल रॅलीस हिरवा झेंडा दाखवुन रॅलीची सुरुवात केली. या ताफ्यामध्ये मनपा अधिकारी व कर्मचारी यांनी तिरंगा हातात घेऊन शहरातील विविध ठिकाणावरुन प्रभागनिहाय रॅलीचे मार्गक्रमण केले.
या रॅलीमध्ये शहरातील विविध गट, युवा स्वंयसेवक, विद्यार्थी, स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वंयसेवी संस्था, बचत गट इत्यादींनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला होता. सदरील तिरंगा रॅली हडको बस स्टॉप पासुन सुरुवात होऊन शहरातील विविध ठिकाणावरुन प्रभागनिहाय मार्गक्रमण करुन कॅनॉल रोड चौक मार्गे साईबाबा मंदिर चैतन्य नगर येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह उपआयुक्त कारभारी दिवेकर, स.अजितपालसिंघ संधु, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता संघरत्न सोनसळे, शिवाजी बाबरे, वैद्यकीय आरोग्य अधिकरी डॉ.सुरेशसिंह बिसेन, नगररचनाकार पवार, शिक्षणधिकारी राजेश पाताळे, अंतर्गत लेखापरीक्षक सुधिर इंगोले, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, सहाय्यक आयुक्त मो. गुलाम सादेक, उद्यान अधिक्षक डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग, स्टेडीयम व्यवस्थापक रमेश चवरे, क्षेत्रिय अधिकारी रावण सोनसळे, संभाजी कास्टेवाड, अग्निशमन अधिकारी केरोजी दासरे, उपअभियंता प्रकाश कांबळे, मनोहर दंडे व मनपा कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
"हर घर तिरंगा" या अभियाना अंतर्गत उद्या दि.१० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजता महापालिकेच्या वतीने "तिरंगा यात्रा" चे आयोजन करण्यात आले आहे. सदरील यात्रा महात्मा ज्योतीबा फुले आय.टी.आय.चौक ते महात्मा गांधी पुतळ्या पर्यंत जाणार असुन या तिरंगा यात्रेत नांदेड शहरातील सर्व सुजान नागरीकांनी, विद्यार्थ्यांनी, शासकीय कर्मचाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment