किनवट : तालुकास्तरीय विविध शालेय क्रीडा स्पर्धेत योगासन या क्रीडा प्रकारात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोणीचे विद्यार्थी चौदा वर्ष वयोगटात मुलीमधून श्रेया संतोष गुंजकर ( प्रथम ) आणि पायल अमोल वाघमारे ( व्दितीय ), तर मुलांच्या गटातून साईनाथ आनंदा बादड ( व्दितीय ) आणि योगेश नामदेव सावरकर ( तृतीय ) हे विजयी झाले असून श्रेया अतिष गुंजकर हिने सहभाग नोंदवला होता.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, किनवट द्वारा आयोजित तालुकास्तरीय विविध शालेय क्रीडा स्पर्धा संपन्न होत आहेत. यामध्ये बुद्धिबळ, योगासने, क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, कुस्ती, कबड्डी, खो-खो, मैदानी, बॅडमिंटन अशा तालुकास्तरीय विविध शालेय क्रीडा स्पर्धा होत आहेत.
नांदेड येथे जिल्हा स्तरावर विद्यार्थ्यांची निवड झाल्याने गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने, शिक्षण विस्तार अधिकारी मनिषा बडगिरे, केंद्रप्रमुख विजय मडावी, केंद्रीय मुख्याध्यापक शरद कुरुंदकर यांच्यासह तालुका क्रीडा संयोजक संदिप यशिमोड, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयवर्धन गुंजकर,
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणीचे क्रीडा शिक्षक राहुल तामगाडगे, क्रीडा प्रशिक्षक अंकुश राऊत, उपक्रमशील शिक्षिका विद्या श्रीमेवार आणि मुख्याध्यापक रमेश मुनेश्वर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment