अतिरिक्त इंग्रजी वर्ग घेण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या नागार्जुना शाळेची चौकशी करण्याची वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 9 August 2024

अतिरिक्त इंग्रजी वर्ग घेण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या नागार्जुना शाळेची चौकशी करण्याची वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी

नांदेड - विद्येचे माहेरघर असलेल्या शाळेत शिक्षणाच्या नावाखाली पैशाची लूट होत आहे. कौठा भागातील नागार्जुन पब्लिक स्कूल मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकविण्यासाठी शाळेच्या वतीने वेगळे अतिरिक्त एक हजार नऊशे रुपये वसूल केले जात आहेत. शाळा व्यवस्थापनाने यापूढे जाऊन विद्यार्थ्यांच्या पालकांना वैयक्तिक फोन-मॅसेज करून तुमच्या मुलाला इंग्रजी वाचता लिहिता यावी याकरिता आम्ही अतिरिक्त वर्ग घेत आहोत असे सांगण्यात आले, हा मेसेज इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना पाठवला आहे. एका वर्गाच्या जवळपास पाच ते सात तुकड्या आहेत आणि प्रत्येक वर्गात जवळपास 40 ते 50 विद्यार्थी आहेत या सर्वांचे अतिरिक्त 1900 रुपये घेतले तर एकूण वीस ते पंचवीस लाख एवढी रक्कम जमा होते. 

          मुळात सीबीएससी बोर्ड असलेल्या या शाळेची मान्यताच इंग्रजी शाळेची आहे म्हणजे येथील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे वेगळे धडे देणे अनिवार्य आहे. तरीसुद्धा शाळा व्यवस्थापनाला अतिरिक्त इंग्रजी वर्ग घेण्याची वेळ का आली ? जर अतिरिक्त वर्ग घ्यायचे असतील तर मग नियमित वर्गामध्ये काय शिकविले जाते ? तसेच जमा केलेल्या २०-२५ लाखांचे काय करणार ? या सर्व प्रकरणाची चौकशी करून शाळा व्यवस्थापनावर योग्य ती कार्यवाही करावी व ज्या विद्यार्थ्यांनी हे अतिरिक्त पैसे जमा केलेत त्यांना ते लवकरात लवकर परत करण्यात यावे अन्यथा  वंचित बहुजन युवा आघाडी नांदेड दक्षिणच्या वतीने मोठ्या स्वरुपात आंदोलन करण्यात येईल या मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांना देण्यात आले. 

         यावेळी युवा आघाडीचे महानगराध्यक्ष गोपालसिंग टाक, महासचिव शुध्दोधन कापसीकर, जिल्हामहासचिव ॲड वैभव लष्करे, सुदर्शन कांचनगिरे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages