गुरुगोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयामध्ये डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 1 August 2024

गुरुगोविंद सिंघजी पत्रकारिता महाविद्यालयामध्ये डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त अभिवादन

नांदेड, (प्रतिनिधी) :

 श्री गुरुगोविंद  सिंघजी  पत्रकारिता  महाविद्यालयामध्ये साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती आणि लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथी  निमित्त अभिवादन करण्यात आले.  यावेळी श्री गुरुगोविंद सिंघजी  पत्रकारिता  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास कदम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. 

पुणे येथील यशदा चे संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी

  डॉ. अण्णाभाऊ साठे  आणि लोकमान्य बाळ गंगाधर  टिळक यांच्या प्रतिमेस  पुष्पहार  घालून  अभिवादन करण्यात आले. डॉ. बबन जोगदंड यांनी प्रासंगिक स्वरूपात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच लोकमान्य टिळकांच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाला प्रा. अमोल धुळे, डॉ. गोपाळ तिवारी, प्रा. विपिन कदम,  प्रा.संजय नरवाडे, विलास वाळकीकर, रोहित माळी, भारत सोनटक्के आदींची उपस्थिती होती.



No comments:

Post a Comment

Pages