गोवेली (प्रतिनिधी) : कल्याण तालुक्यातील गोवेली येथील जीवनदीप महाविद्यालयात कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कल्याण ग्रामीण शाखेच्या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थी व रसिक प्रेक्षकांसाठी ' पाऊस कवितांचा ' या काव्यसादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी सुरू केलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रात अनेक शाखा कार्यरत आहेत. कल्याण ग्रामीण भागात साहित्य आणि संस्कृतीचे संवर्धन व्हावे इथल्या बोलीभाषांचे जतन व्हावे तसेच वाचन,लेखन परंपरा समृद्ध व्हाव्यात म्हणून कल्याण ग्रामीण शाखेची स्थापना श्री. रविंद्र घोडविंदे यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली.
या शाखेच्या माध्यमांतून हा कार्यक्रम जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास कोकण मराठी साहित्य परिषदेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष बाळ कांदळकर , कल्याण ग्रामीण शाखा अध्यक्ष रविंद्र घोडविंदे यांची उपस्थिती लाभली होती. स्वागत समारंभानंतर लेखनकार्य प्रीत्यर्थ अनिल सुरोशी, धनाजी बुटेरे , ललित गाजरे यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या काव्य सादरीकरणाच्या कार्यक्रमात उस्फूर्तपणे सहभागी होऊन स्वरचित कविता सादर केल्या. ठाणे,कल्याण,उल्हासनगर,अंबरनाथ,मुरबाड शाखांमधील उपस्थित निमंत्रित कवींनी आपल्या विविध कविता सादर केल्या. त्यानंतर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले बाळ कांदळकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
त्यात ते म्हणाले "आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी साहित्याचे ,आपल्या संस्कृतीचे जतन संवर्धन केले पाहिजे" तसेच त्यांनी आपल्या शैलीत कविता सादर करून विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. "लेखन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन केले पाहिजे" असे मार्गदर्शनात सांगितले. यावेळेस ठाणे जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह मा.श्री सुनील बडगुजर साहित्यिक गिरीश कंटे, कोकण मराठी साहित्य परिषद शाखा कल्याण ग्रामीण चे उपाध्यक्ष श्री हरिश्चंद्र मिरकुटे निमंत्रित कवी आणि सत्कारमूर्ती धनाजी बुटेरे ,अनिल सुरोशी ,ललित गाजरे,अजित महाडकर, दीपश्री इसामे ,निशिकांत महांकाळ ,वासुदेव सांबरे ,ए.आर. निकम ,लक्ष्मण घागस ,भूषण सोनवणे ,प्रिया मयेकर, प्रकाश माळी, भालचंद्र गोडांबे, योगेंद्र बांगर कल्याण शाखेचे सर्व कार्यकारिणी सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य के.बी.कोरे , कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य ,प्रकाश रोहणे सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली होती.
याप्रसंगी महाविद्यालयातील ग्रंथालयात प्रा. राजाराम कापडी यांच्या सहकार्यने मराठी साहित्यातील महत्वाच्या ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाखेचे कार्यवाह अनिल सुरोशी यांनी केले. उपप्राचार्य हरेंद्र सोष्ठे यांनी उपस्थितांचे आभार मानले. तर कार्यक्रमाचे संचालन प्रा. सतीश लकडे यांनी केले. उत्साही वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.
No comments:
Post a Comment