गोवेली (प्रतिनिधी) : ज्यांना शैक्षणिक चळवळीचे दुसरे नाव संबोधले जाते असे ज्येष्ठ शिक्षक तज्ञ, पत्रकार आणि जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे यांना पर्यावरण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एका गरीब शेतकरी मुलापासून ते शिक्षण महर्षीपर्यंतचा प्रवास करत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. खडतर परिस्थितीवर मात करत डी.एड पर्यंतचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले.शिक्षण घेण्यासाठी जे आपल्याला सोसावं लागलं ते इतर कोणालाही लागू नये म्हणून ग्रामीण भागात ज्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना जीवाच रान करावं लागत होतं त्याच परिसरात रवींद्र घोडविंदे यांनी 1990मध्ये 'जीवनदीप शैक्षणिक संस्था' नावाचं ज्ञानसंकुल उभारलं आणि या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गोवेली, खर्डी, म्हसा ,टिटवाळा यांसारख्या ग्रामीण भागात महाविद्यालय उभारली. आज या संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी आपले भविष्य घडवत आहेत.केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नाही तर सामाजिक कार्यात सुद्धा नेहमीच ते तत्पर असतात,अशा थोर समाजसेवक, शिक्षण महर्षी रवींद्र घोडविंदे यांनी आजवर केलेल्या समाजहिताच्या कार्याची दखल घेत,पर्यावरण बहुउद्देशीय संस्थेने त्यांना समाजभूषण पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला.आणि त्याच्या हातून अशीच लोकहिताचे कार्य घडत राहो, अशा शुभेच्छा दिल्या.
त्याच्या या पुरस्काराबद्दल महाविद्यालयचे प्राचार्य.डॉ. के. बी. कोरे, सौ. स्मिता घोडविंदे ,संचालक प्रशांत घोडविंदे ,उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे त्याचबरोबर सर्व प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थ्यांनी यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment