युगकवी वामनदादा कर्डक , प्रतापसिंग बोदडे संयुक्त जयंती सोहळ्याचे नांदेडात आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 16 August 2024

युगकवी वामनदादा कर्डक , प्रतापसिंग बोदडे संयुक्त जयंती सोहळ्याचे नांदेडात आयोजन

नांदेड : युगकवी  वामनदादा कर्डक आणि त्यांचे पट्टशिष्य प्रतापसिंग बोधडे यांच्या संयुक्त जयंती सोहळ्याचे नांदेड शहरात आयोजन करण्यात आले आहे. यंदा  या सोहळ्याचे 19 वे वर्षे आहे.

    नांदेड येथील कुसुम सभागृहात शनिवार 24 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता एम. सायलुअण्णा म्हैसेकर यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे तसेच फारुख अहमद हे अध्यक्ष असणार आहे तर स्वागताध्यक्ष इंजि. प्रशांत इंगोले असणार आहेत. 

त्याचप्रमाणे सामजिक व पत्रकारिता क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना तुफानातले दिवे पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.               या जयंती सोहळ्यात महाराष्ट्रातील नामवंत गायक नगसेनदादा  सावदेकर , डॉ.किशोर वाघ, मेघानंद जाधव,अशोक निकाळजे ,चेतन चोपडे,अजय देहाडे ,  इत्यादींची गाणी ऐकायला मिळणार आहे .


तसेच प्रमुख उपस्थिती व प्रमुख पाहुणे म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीत हा जयंती सोहळा पार पडणार आहे.तरी,हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मुख्य संयोजक संजय दत्ता निवडंगे व निमंत्रक डॉ.विजय कांबळे यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Pages