किनवट :-
स्व. गंगाधररावजी पांपटवार जयंती महोत्सव व स्व. गंगाधररावजी पांपटवार वैद्यकीय सहकारी संस्था संचलित टीचर्स क्लब रुग्णालय या सेवाभावी हॉस्पिटलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार दिनांक 16 सप्टेंबर 2024 रोजी विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा जीवन गौरव पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कुसुम सभागृह नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांताबाई पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे, स्वागताध्यक्ष प्रा. डी. बी. जांभरुणनर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना जीवनगौरव पुरस्कारने सन्मानित केले. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक जगदीश कदम (साहित्य), बालाजी जाधव (उद्योजकता), डॉ. जगन्नाथ (नाथा) चितळे (कला), ज्ञानेश्वर महाराज (समाजसेवा), गोपाळ पा. इजळीकर (कृषी), चारुदत्त चौधरी (पत्रकारिता) यांचा समावेश होता.
अभियंता प्रशांत ठमके यांनी मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ,अंबाडी आणि मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,गोकुंदा या सारख्या संस्थेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ठिकाणापासून दीडशे किलोमीटर अंतरावर असलेल्या विदर्भ विभाग व तेलंगणाच्या राज्याच्या सीमेवरती वसलेल्या आदिवासी दुर्गम, डोंगरी, आदिवासी
किनवट तालुक्यात प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा स्थापन केल्या तसेच कनिष्ठ महाविद्यालय सुद्धा स्थापन केले. खेड्यातील मुलांना तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेता यावे याकरिता वस्तीगृह स्थापन केले. त्यांच्या याच शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना मान्यवराचा हस्ते सन्मानपत्र व वस्त्र देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी नांदेड व परिसरातील सुज्ञ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्व. गंगाधरराव पांपटवार वैद्यकीय सहकारी संस्थेचे अध्यक्ष गजानन पांपटवार व तिरूमला फाउंडेशनच्या सचिव अंजली पांपटवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
No comments:
Post a Comment