जीवनदीप महाविद्यालयातील खेळाडूंची महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागात विविध पदांवर थेट नियुक्ती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 28 September 2024

जीवनदीप महाविद्यालयातील खेळाडूंची महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागात विविध पदांवर थेट नियुक्ती


गोवेली (प्रतिनिधी): जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचलित  कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय गोवेलीच्या खेळाडूंची महाराष्ट्र शासनातर्फे "अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडू" म्हणून शासनाच्या क्रीडा राजपत्रित अधिकारी, कर्मचारी पदावर थेट नियुक्ती करण्यात आली आहे.आतापर्यंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळांमध्ये सहभाग घेऊन घवघवीत यश संपादन केलं आहे तसेच मुंबई विद्यापीठात जीवनदीप महाविद्यालय क्रीडा विभागामध्ये नेहमीच टॉप टेन क्रमांकात राहिले आहे. आणि आज याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलेला आहे. 


गोवेली महाविद्यालयाची विद्यार्थ्यांनी जयवंती वसंत देशमुख हिची कार्यकारी क्रीडा अधिकारी गट-ब मध्ये,सोनाली छबुराव गीते कार्यकारी क्रीडा अधिकारी गट-ब मध्ये तसेच श्रुती केशव तरे सहाय्य क्रीडा अधिकारी गट-क मध्ये यांची नियुक्ती झाली आहे. त्याचबरोबर काजल कृष्णा भाकरे कर्मचारी गट-ड,कामिनी गणेश बोस्टे कर्मचारी गट- ड या पदावर यांची नियुक्ती झाली आहे.या पूर्वीही जीवनदीप महाविद्यालयातील विद्यार्थी रेल्वे,महसूल,मंत्रालय, जिल्हा परिषद तसेच इतर केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये राजपत्रित पदावर कार्यरत आहेत. या पदापर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली होती आणि आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे त्यांच्या या कामगिरीने त्यांनी जीवनदीप संस्थेचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे.

 त्यांच्या या कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. रवींद्र घोडविंदे संचालिका सौ .स्मिता घोडविंदे,संचालक प्रशांत घोडविंदे, प्राचार्य.डॉ. के.बी.कोरे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, प्रा. सुरेश चेडे,क्रीडा प्राध्यापक मोहनिष देशमुख,  त्याचबरोबर सर्व प्राध्यापक  शिक्षकेतर कर्मचारी,खेळाडू विद्यार्थी , यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

No comments:

Post a Comment

Pages