किनवट, दि.२८: तालुका मातंग समाज संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष शिवन्ना कलगोटूवार यांच्या नेतृत्वात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात देशी दारुच्या दुकानास परवानगी देण्यात येऊ नये,या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयात व तहसील कार्यालयात नुकतेच देण्यात आले.
यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष भगवान मारपवार,मातंग समाज तालुका युवाउपाध्यक्ष गंगाधर मुकनेपेल्लीवार,माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार,दत्तुपंत पुलेवार,लक्ष्मणराव बोलेनवार,रमेश राशर्लावार,किशोर देवतळे,पोशराव सावपेल्लीवार, मुंबईकर,सुनिल इंगोले,लक्ष्मण कुंटलवार,गंगारेड्डी सुकंटवार,रविकुमार दिसलवार,सुभाष आगीमेलीवार,प्रमोद सुध्दलवार,प्रदिप दोनकोंडवार व कृष्णा शिंदे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment