बौद्ध लेणीला बजावलेल्या नोटीस विरुद्ध आंबेडकरी अनुयायांमध्ये तीव्र संताप ; ७ ऑक्टोबर ला विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 28 September 2024

बौद्ध लेणीला बजावलेल्या नोटीस विरुद्ध आंबेडकरी अनुयायांमध्ये तीव्र संताप ; ७ ऑक्टोबर ला विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय


छ.संभाजीनगर दि.२८ : बौद्ध लेणी च्या पायथ्याशी मागील ६० ते ७० वर्षांपासून असलेले प्रज्ञा प्रसार बुद्ध विहारांचे व भिख्खू कुटीस अतिक्रमण असल्याचे संबोधून बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या वतीने भारतीय न्याय संहितेच्या कलम 168 प्रमाणे नोटीस बजावण्यात आल्याने बौद्ध लेणीवर हजारोंच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत दि.०७ ऑक्टोबर ला मोर्चा काढण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.

मागील ७० वर्षांपासून बौद्ध भिख्खू बौद्ध लेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहारात वास्तव्यास आहेत, महाराष्ट्रातील बौद्ध अनुयायांचे हे श्रद्धेचे ठिकाण असल्याने खोडसाळ पणे बौद्ध लेणी ला अतिक्रमण संबोधून कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा हा प्रयत्न असल्याने पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांना तात्काळ पदावरून हटविण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन घेऊन हजारोंचा समुदाय हा पोलीस आयुक्त कार्यालयावर पोहोचला होता यावेळी सहा.पोलीस आयुक्त संपत शिंदे यांनी निवेदन स्वीकारले.


पोलिसांनी व्यक्त केली दिलगिरी


गैरसमजुतीतुन नोटीस बाजावल्याचे सांगून नोटीस काढून घेत पोलिसांनी दिलगिरी व्यक्त करत शांतता राखण्याचे आवाहन केले.

विविध आंबेडकरी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेकडो वकील, प्राध्यापक, बौद्ध अनुयायी यांनी घोषणाबाजी करत पोलीस आयुक्तालय दणाणून सोडले.

अखिल भारतीय भिख्खू महासंघाच्या वतीने दि.०७ ऑक्टोबर रोजी बौद्ध लेणीस तिर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात येऊन बौद्ध लेणीचा विकास करावा, सर्व मूलभूत सुविधा देण्यात याव्या यासाठी क्रांतिचौक ते विभागीय आयुक्त असा मोर्चा भदंत विशुद्धानंद बोधी महास्थवीर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार असून त्यास हजारोंच्या संख्येने बौद्ध अनुयायांनी, आंबेडकरी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन 

भन्ते नागसेन बोधी महाथेरो, भंते संघप्रिय, भंते सत्यपाल, भंते धम्मज्योती, भंते अभयपुत्र,भंते बोधीधम्म, भंते उपाली, भंते निर्वाण, भंते आनंद, भन्ते चंद्रबोधी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages