किनवट दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 28 September 2024

किनवट दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत

किनवट,दि.२८: तालुका विधी सेवा  समितीच्या वतीने  दिवाणी न्यायालयात आज(दि.२८) सकाळी साडेदहा वाजता राष्ट्रीय लोक अदालत घेण्यात आली.

     लोक अदालतीमध्ये येथील दोन्ही न्यायालयातील लोक न्यायालयात ठेवण्यात आलेले सर्व दिवाणी, फौजदारी व प्रलंबित प्रकरणे आणि ठेवण्यात आलेली सर्व दाखलपूर्व प्रकरणे तसेच दोन्ही न्यायालयातील गुन्हा कबुलीची ठेवण्यात आलेली सर्व प्रकरणे घेण्यात आलीत.पॅनल क्रमांक एक वर प्रमुख म्हणून न्यायाधीश आणि तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष  पी.एम.माने, पॅनल क्रमांक दोनवर प्रमुख म्हणून सह दिवाणी न्यायाधीश के.जी.मेंढे ,तर सदस्य  म्हणून अॅड.पी.जी.घुले यांनी काम पाहिले. लोक न्यायालयाच्या यशस्वीतेसाठी वकील संघाचे अध्यक्ष अॅड.राहुल सोनकांबळे, सचिव अॅड.सुनिल सिरपुरे यांच्यासह त्यांचे सहकारी व न्यायालयीन कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.



No comments:

Post a Comment

Pages