किनवट : येथील विठ्ठलेश्वर मंदिर परिसरातील ज्येष्ठ नागरिक विजय नारायणराव तम्मडवार (वय८२) यांचे आज (दि.२०) सकाळी ९ वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने नांदेड येथील रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर आजच सायंकाळी ४.३० च्या सुमारास पैनगंगा नदी तिरावर असलेल्या कैलास मोक्षधाम स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना,जावई, नातू असा परिवार आहे. येथील शिक्षक संदीप तम्मडवार यांचे ते वडील असून, पत्रकार अरूण तम्मडवार यांचे ते वडील बंधू होत.
No comments:
Post a Comment