किनवट: येथुन जवळच असलेल्या गोकुंदा येथील सम्राट अशोक बुद्ध विहार राजर्षी शाहू नगर येथे भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने दि.१७सप्टेंबर रोजी चैत्यभूमी चे शिल्पकार सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन व अनागारिक धम्मपाल यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.प्रारंभी प्रतिमा पुजन करुन संस्कार उपाध्यक्ष प्रा.सभाष गडलिंग व संस्कार सचिव बौद्धाचार्य अनिल उमरे यांनी वंदना घेतली.रिपाईचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरी बद्दल नांदेड येथे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित भारतीय बौध्द महासभेचे तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांचा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा व वार्ड शाखेचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते प्रमुख अतिथी सावित्री बाई फुले विचारमंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके यांच्यासह भव्य सत्कार करण्यात आला .
प्रमुख अतिथी भारतीय बौध्द महासभेचे तालुका सरचिटणीस प्राचार्य राजाराम वाघमारे, अखिल भारतीय बौध्द उपासक संघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष उत्तम कानिंदे यांनी सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर व अनागारीक धम्मपाल यांच्या भारतातील धम्म प्रसार कार्यावर प्रकाश टाकला व सत्कारमूर्ती अभियंता प्रशांत ठमके यांनी सत्कार प्रसंगी किनवट तालुक्यातील मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ व मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अविरतपणे दैदिप्यमान शैक्षणिक कार्य करुन आदिवासी डोंगराळ भागात शैक्षणिक क्रांती केली तसेच भारतीय बौध्द महासभेच्या माध्यमातून धम्मचळवळ गतीमान करत सामाजिक सत्कार्य केल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव केला.यावेळी सत्कारमूर्ती यांनी सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर व अनागारीक धम्मपाल यांच्या कार्याचा आढावा घेऊन विविध शाखेच्या वतीने भव्य सत्कार केल्याबद्दल आभार व्यक्त करत मला मिळालेला हा जीवनगौरव पुरस्कार हा माझा सन्मान नसून संस्थेच्या कार्याचा सन्मान असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी यश रामराव घुले व आदर्श साहेबराव वाढवे यांचा एम.बी.बी.एस.साठी निवड झाल्याबद्दल पालकांसह सत्कार करुन संस्थेच्या वतीने शुभांगी ठमके यांनी प्रत्येकी पाच-पाच हजार रुपये बक्षीस दिले.तसेच सुयश प्रशांत ठमकेचीही एम.बी.बी.एस.साठी निवड झाल्याबद्दल सत्कारमूर्तीचा सपत्नीक सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला.अध्यक्षियसमारोपात दादाराव कयापाक यांनी शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कार्य करणाऱ्या योग्य व्यक्तीची निवड करुन अभियंता प्रशांत ठमके यांना नांदेड येथे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नांदेड जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष महेंद्र नरवाडे यांनी केले तर वार्ड अध्यक्ष बंडू भाटशंकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अखिल भारतीय बौध्द उपासक संघाचे तालुका सरचिटणीस डॉ.प्रा.पंजाब शेरे,भारत कावळे, सुरेश पाटील, रमाकांत गायकवाड, प्रफुल डवरे,सतिश विणकरे,प्रवीण वाठोरे यांनी पुढाकार घेतला.यावेळी क्रांतीसुर्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष रमेश मुनेश्वर, शेषेराव पाटील, रुपेश मुनेश्वर डॉ.प्रा आनंद भालेराव यांच्या सह असंख्य उपासक उपासिका तसेच बौद्ध महासभेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment