भीमराव केराम व सचिन नाईक यांचे उमेदवारी अर्ज दाखल - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 28 October 2024

भीमराव केराम व सचिन नाईक यांचे उमेदवारी अर्ज दाखल


किनवट : किनवट विधानसभा मतदारसंघात आज(ता.२८) भारतीय जनता पक्षाचे उमेदवार भीमराव केराम व शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते सचिन नाईक यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले.

     गोंड राजे हुतात्मा शंकरशहा रघुनाथ शहा विचार मंचापासून फेरी काढून मोठे शक्ती प्रदर्शन करत आमदार भीमराव केराम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.फेरीत सहभागी आदिवासी दंडार,घुसाडी च्या कलावंतांनी लक्ष वेधून घेतले होते.या कलावंतासह हजारो बांधवांनी उपस्थिती दर्शविली होती.यात ग्रामीण  नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता.शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते सचिन नाईक यांनी कलावती गार्डन येथून फेरी काढून शक्ती प्रदर्शन करत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. सचिन नाईक हे यवतमाळ जिल्ह्यातील मंत्री श्री.राठोड यांचे मेव्हणे  आहेत. त्यांच्या फेरीत युवकांचा सहभाग लक्षणीय होता.सचिन नाईक यांच्या उमेदवारी अर्जाने महायुतीत बंडखोरी  होईल की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे .

दरम्यान,दोनही फेरीत सहभागी झालेले अनेकजण  हे संबंधितांकडून  आपल्याला योग्य मोबदला मिळाला नसल्याबाबत नाराजी व्यक्त करताना दिसत होते.


No comments:

Post a Comment

Pages