राजर्षी शाहू नगर गोकुंदा येथील सम्राट अशोक बुद्ध विहारात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा वाचन समारोप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 21 October 2024

राजर्षी शाहू नगर गोकुंदा येथील सम्राट अशोक बुद्ध विहारात बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा वाचन समारोप


किनवट :   भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने आयोजित गोकुंदा येथील सम्राट अशोक बुद्ध विहार राजर्षी शाहु नगर येथे दि.२०ॲाक्टोबर  रोजी वर्षावास कार्यक्रमाचा समारोप  करण्यात आला.  भारतीय बौध्द महासभेचे तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात  भारतीय बौध्द महासभेचे संस्कार उपाध्यक्ष प्रा.सुभाष गडलिंग सर यांनी   या विहारात येऊन  डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित "बुद्ध आणि त्याचा धम्म " या ग्रंथाचे वाचन करून विविध  विषयांवर  सुबोध मार्गदर्शन केले, त्याबद्दल त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष अभियंता प्रशांतजी ठमके यांनी सत्कार केला.तीन महिन्यात आम्ही काय श्रवण केले, काय समजले यावर,   उपासिका वंदना बागेश्वर, आदर्श शिक्षक सुरेश पाटील यांच्या सह अनेक श्रोत्यांनी मनोगत व्यक्त केले. 


यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी.प्रा.अन्ना मुन,प्रा डॉ.उत्तम शेंडे,प्रा.संघरत्ना आठवले ,प्रा.रेखाताई मुन यांनी ही मार्गदर्शन केले.यावेळी सावित्रीबाई फुले विचार मंच च्या अध्यक्षा शुभांगी ताई ठमके यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, बंडू भाटशंकर  यांनी केले तर विनय वैरागडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.याप्रसंगी असंख्य बौद्ध उपासक उपासिका यांची उपस्थिती होती.सरनतय गाथेनतर उपस्थितांना भोजनदान करण्यात आले.


No comments:

Post a Comment

Pages