किनवट : डॉ.मनोज घडसिंग हे गोकुंदा येथील उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक असतांना त्यांनी त्यांच्या कार्यकाळात दिव्यांग विभागाचे संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संगनमत करून व लक्ष्मी दर्शन करून काही जणांना बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिले आहेत.तसेच काही प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी सध्या दाखल करण्यात आले आहेत.परंतु, लक्ष्मी दर्शन न झाल्यायाने असे प्रमाणपत्र हे नुतनीकरण न करता मागील अनेक महीन्यांपासून प्रलंबित ठेवण्यात आले आहेत.या प्रकरणाची चौकशी करून त्यांना तात्काळ बडतर्फ करा व त्यांच्यावर गुन्हे नोंदवा, अशी मागणी नांदेड जिल्हा दिव्यांग मुव्हमेंट या संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड.मिलिंद सर्पे यांनी एका निवेदनाद्वारे सर्व संबंधितांकडे केली आहे.
गोकुंदा(ता.किनवट) येथील उपजिल्हा रूग्णालयात किनवट व माहूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात येते.दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांचे एक बोर्ड असते.दिव्यांग बांधवांची तपासणी केल्यानंतर संबंधित तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहीनीशी त्यांना प्रमाणपत्र देण्यात येते.या कार्यपध्दतीचा गैरफायदा घेत तत्कालीन वैद्यकीय अधिक्षक डॉ.मनोज घडसिंग यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संगनमत करून काही
जणांना दिव्यांग नसतानाही लक्ष्मी दर्शन करून त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र दिले आहे.या प्रमाणपत्राच्या आधारे दोघांना सरकारी नौकरी ही लागलेली आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया घेण्यासाठी तत्कालीन वैद्यकीय अधिक्षक यांच्याशी संपर्क साधला त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार तर दिलाच परंतु, असे सांगितले की, मी किनवटचे एक माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे एक बडे नेते यांचा जवळचा नातेवाईक आहे.तुम्हाला काय लिहायचे ते लिहा.तुम्ही मोकळे आहात.माझे काहीही वाकडे होणार नाही.संबंधित दुसऱ्या एका वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मी किनवट तालुका शिवसेना प्रमुखांचा जवळचा नातेवाईक आहे.तुम्हाला काय लिहायचे आहे ते लिहा,मला काही फरक पडत नाही. पुजा खेडकरांच्या पार्श्वभूमीवर अनेक दिव्यांग प्रमाणपत्राच्या तक्रारी होत आहेत. या तक्रारीची दखल दखल सध्या प्रशासन गांभीर्याने घेत आहे.तेंव्हा किनवटच्या प्रकरणाची दखल प्रशासनाने घ्यावी,अशी अपेक्षा अॅड.सर्पे यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment