किनवट : सर्व पक्षीय आंबेडकरवादी व संविधानप्रेमी कृती समितीच्या वतीने आज(दि.१६) दिलेल्या किनवट बंदच्या हाकेला १०० टक्के प्रतिसाद मिळाला.
कृती समितीच्या वतीने दुपारी १२ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून मोर्चा काढण्यात आला.शहरातील प्रमुख मार्गाने फिरुन मोर्चा तहसील कार्यालयावर पोहचला.एका शिष्टमंडळाने तहसीलदार यांना निवेदन सादर केले.निवेदनात नमुद केले आहे की,परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या मुख्य आरोपीना तात्काळ अटक करून परभणीतील कायदा व सुव्यवस्था स्थिती हाताळण्यात अपशयी ठरलेल्या पोलीस अधिका-यावर निलंबनाची कारवाई करा.
परभरणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची काही जातीयवादी समाजकंटाकडुन १० डिसेंबर रोजी तोडफोड करून विटंबना करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ परभणीतील आंबेडकरी समुदायाने १२ डिसेंबर रोजी बंदची हाक दिली होती. या बंदच्या काळात कायदा व सुव्यवस्था स्थिती आबाधीत राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची जबाबदारी परभणी पोलीसांची होती. परंतु, परभणी पोलीसांनी आवश्यक ती खबरदारी न घेतल्यामुळे परिस्थिती चिघळली आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. या परिस्थीतीला परभणीचे पोलीसच पूर्णतः जबाबदार असतांना मात्र त्यासाठी आंबेडकरी समुदयांला जबाबदार धरून त्यांच्यावर पोलीसाकडून अन्याय- अत्याचार करण्यात येत आहेत. पोलीसांच्या या दंडेलशाहीचा आम्ही किनवट तालूक्यातील सर्वपक्षीय आंबेडकरवादी आणि संविधानप्रेमी नेते, कार्यकर्ते व नागरीक जाहिर निषेध करतो,असे नमुद केले आहे.
परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करुन विटंबना करणाऱ्या मुख्यसुत्रधाराचा तात्काळ शोध घेऊन त्यांना बेड्या ठोका आणि या विटंबना प्रकरणातील आरोपीविरुध्व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी कार्यकत्याचा न्यायालयीन कोठडीत १५ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस जबाबदार धरुन पोलिस निरीक्षक अशोक घोरखंड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी कार्यकत्याच्या कुटुंबीयाना शासकिय निधीतुन ५० लाख रुपये मदत द्या,निष्पाप आंबेडकरी नागरीक विशेषतः तरुणावर एफआयआर दाखल करून त्यांना अमानुष मारहाण करण्यासाठी नियोजनबध्दरितीने राबविण्यात येणारे परभणी येथील पोलीसांचे कोबिंग ऑपरेशन तात्काळ थांबवा,परभणीतील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास अपयशी ठरलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चीत करुन त्यांना निलंबीत करा आणि त्यांची विभागीय चौकशी करि,१२ डिसेंबर रोजी परभणी येथील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती हाताबाहेर जाण्यास पोलीस निरीक्षक अशोक घोरबाड ही जबाबदार असून त्यांनाही या प्रकरणात सहआरोपी करून त्यांना तात्काळ निलंबीत करा,अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर दादाराव कयापाक रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया, मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष,विनोद भरणे (पीपल्स रिपलब्लीन पार्टी, नांदेड जिल्हा अध्यक्ष),
अॅड. मिलिंद सर्पे (तालूका विधी सेवा समिती सदस्य), अरुण आळणे माजी नगराध्यक्ष,शंकर नगराळे, अध्यक्ष शांती भुमी,
विजय पोलसवार नाभीक महामंडळ महा. प्रदेश कार्यकारीणी सदस्य,प्रविन गायकवाड सामाजिक कार्यकर्ता,विवेक ओंकार तालूका अध्यक्ष, रिपाइं (आठवले),राहुल सर्पे,सामाजिक कार्यकर्ता,निखील दिपक वाघमारे, ता. अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी किनवट ,अॅड. सम्म्राट सर्पे, युवा पॅथर, तालुका अध्यक्ष,मिलिंद कांबळे,निखील कावळे सुगध नगराळे तालूका अध्यक्ष (युवक अध्यक्ष) राष्ट्रवादी अजितपवार गट,दिनेश कांबळे वंचित बहुजन आघाडी ता. उपाध्यक्ष
गंगुबाई परेकार आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.
No comments:
Post a Comment