'महाराष्ट्र बंद' मध्ये विविध आंबेडकरी पक्ष संघटना सहभागी होणार सुभेदारी विश्रामगृह येथील बैठकीत निर्णय - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 15 December 2024

'महाराष्ट्र बंद' मध्ये विविध आंबेडकरी पक्ष संघटना सहभागी होणार सुभेदारी विश्रामगृह येथील बैठकीत निर्णय


छ. संभाजीनगर दि.१५ परभणी येथील बंद दरम्यान झालेल्या हिंसाचारात अटक सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या भीमसैनिकाचा पोलीस कस्टडीत संशयास्पद मृत्यू झाल्याने त्या विरोधात उद्या दि.१६ डिसेंबर रोजी रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद चे आयोजन केले आहे. 

त्यानुसार आज सुभेदारी विश्रामगृह येथे विविध आंबेडकरी पक्ष संघटना यांनी महाराष्ट्र बंद मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी रिपब्लिकन सेना, पँथर्स रिपब्लिकन पार्टी,बहुजन समाज पक्ष,भीमशक्ती सामाजिक संघटना, रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र, भारतीय क्रांती दल, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, बी आर एस पी, सेक्युलर रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष, आजाद समाज पार्टी, भीमआर्मी भारत एकता मिशन, रिपाई (खरात), रिपब्लिकन विद्यार्थी सेना, ऑल इंडिया समता सैनिक दल, पँथर सेना, रिपाई (राजरत्न आंबेडकर), आंबेडकरवादी बहुजन विकास समिती, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, संविधान बचाव आघाडी, भीमशक्ती रोजदारी कर्मचारी संघटना, प्रहार जनशक्ती पक्ष,सम्यक विद्यार्थी आंदोलन, पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी, भारतीय दलित पँथर, स्वतंत्र लोकसत्ता पक्ष, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, आदी पक्ष संघटनांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.

तर उद्याच्या बंद मध्ये सर्व आंबेडकरी/संविधानवादी नागरिक, भीमसैनिक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन रमेश गायकवाड, डॉ.सिद्धांत गाडे, चंद्रकांत रुपेकर, मुकुंद सोनवणे, राजूभाई साबळे, शैलेंद्र मिसाळ, सचिन निकम, मिलिंद बनसोडे, अरविंद कांबळे,विनोद कोरके, वसंतराज वक्ते, डॉ.दीपक खिल्लारे, बलराज दाभाडे, दीपक निकाळजे, राहुल वडमारे, संतोष मोकळे, राष्ट्रपाल गवई, प्रा.सिद्धोधन मोरे,काकासाहेब गायकवाड, अस्कर खान, ऍड.अभय टाकसाळ, राजू हिवराळे, दिपक जाधव आदींनी केले आहे.


शांततेत बंद पार पाडणार


उद्याचा बंद हा संविधानिक मार्गाने पार पडणार असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्षता घेतली जाणार आहे, व्यापारी महासंघ, रिक्षा चालक मालक संघटना, विविध विद्यार्थी संघटना याना बंदला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. कुठल्याही प्रकारे सामान्य नागरिकांना बंद चा त्रास होऊ नये याची दक्षता घेतली जाणार असून व्यापारी बांधवांना विनंती पत्र देऊन बंद ला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Pages