संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. रिपब्लिकन सेनेची विभागीय आयुक्तांकडे मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 11 December 2024

संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. रिपब्लिकन सेनेची विभागीय आयुक्तांकडे मागणी

छ. संभाजीनगर : परभणी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या माथेफिरूवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवुन घटनेमागील मास्टरमाइंड चा शोध देण्यात यावा अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्या वतीने विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


 माथेफिरू सोपान पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी अश्या घटनांना पाठीशी घातले जात असल्याने या मागे सरकार मधील लोकांचे पाठबळ असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून घटना बदलण्याची भाषा करणाऱ्या केंद्र व राज्य सरकारमधील आमदार खासदार संविधान बदलण्याची भाषा करत आहेत, अश्या वाचळांना सत्ताधारी पाठीशी घालत असल्याने संविधान विरोधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व धर्मांध संघटनांनी अश्या माथेफिरू लोकांना फूस लावली असल्याने संविधान विरोधी वक्तव्य, लिखाण, कृती करणाऱ्या लोकांना कठोर शासन होत नसल्याने सरकारच्या भूमिकेवर आमचा संशय व्यक्त करत सरकारचा निषेध करण्यात आला आहे.

यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष काकासाहेब गायकवाड, मिलिंद बनसोडे, सचिन निकम, अस्कर खान, चंद्रकांत रुपेकर, प्रा.सिद्धोधन मोरे, बबन साठे, अजय बनसोडे, विनोद वाकोडे, सुनील पांडे, असजद खान, चैनसिंग ठाकूर, ऍड.अतुल कांबळे, विकास रोडे, ऍड.तुषार अवचार, धम्मपाल भुजबळ आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages