जीवनदीप मध्ये पार पडल्या अंतर महाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग टूर्नामेंट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 11 December 2024

जीवनदीप मध्ये पार पडल्या अंतर महाविद्यालयीन पॉवरलिफ्टिंग टूर्नामेंट

कल्याण : 

युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई ठाणे झोन क्रिडा समिती आणि जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई, संचलित कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय गोवेली आयोजित दि.7 आणि 8 डिसेंबर  2024 रोजी इंटर कॉलेजिएट पॉवरलिफ्टिंग टूर्नामेंट चे आयोजन करण्यात आले होते. पुरुष व महिला या दोन गटात पावर लिफ्टिंग टूर्नामेंटचे  आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले संजय सरदेसाई ( सचिव महाराष्ट्र पावर लिफ्टिंग असोसिएशन) राहुल अकुल ( ठाणे झोन सचिव ) यज्ञेश्वर बागराव( ठाणे झोन सचिव ) देवदत्त भोईर ( अध्यक्ष ठाणे पावर लिफ्टिंग असोसिएशन )प्रा. नवनाथ गायकर, व प्रा. सुरेश चेडे ( निवड समिती  पॉवरलिफ्टिंग स्पर्धा मुंबई विद्यापीठ) प्रमोद बोराडे( मुंबई विद्यापीठ प्रतिनिधी ) यांची प्रमुख  उपस्थिती लाभली  होती या स्पर्धेसाठी एकूण 340 स्पर्धक सहभागी झाले होते.

यामध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली उल्लेखनीय कामगिरी 

  मुले

1) 59 किलो वजनी गटात विराज पावसकर यांनी मिळालेले कांस्य पदक 

2) 74 किलो वजनी गटात मोरेश  कार्ले याने मिळवले सुवर्ण पदक 

3)74 किलो वजनी गटात कल्पेश तांडेल रौप्य पदक

4 )83 किलो वजनी गटात प्रांजल पाटेकर सुवर्णपदक

5) 92 किलो वजनी गटात विवेक सांबरे रौप्य पदक 

6)105 किलो वजन गटात सिकंदर यादव रौप्य पदक 

7)120 किलो वजनी गटात कार्तिक याने मिळवले रौप्य पदक 

8) ऋषिकेश फुलोरे 83 किलो वजनी गटात कांस्य पदक 


मुली


1) 47 किलो वजन गटात शिफा शेख सुवर्णपदक 

2) 47 किलो वजन गटात रुचिता गायकर कांस्य पदक

3) 57 किलो वजनी गटात नरसम्मा मलाप्पा  सुवर्णपदक 

4) 63 किलो वजनी गटात दिव्या शिरोशे सुवर्णपदक

याचप्रमाणे विशेष म्हणजे मुले आणि मुली या दोन्ही संघाचे सांघिक विजेतेपद गोवेली महाविद्यालयास मिळाले.


यावेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले  संजय सरदेसाई ( सचिव महाराष्ट्र पावर लिफ्टिंग असोसिएशन ) राहुल अकुल ( ठाणे झोन सचिव) यज्ञेश्वर बागराव ( ठाणे झोन सचिव नितीन कुडाळकर साहिल उत्तेकर  संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे. संस्थेच्या संचालिका  स्मिता घोडविंदे  संचालक प्रशांत घोडविंदे. प्राचार्य डॉ. के. बी. कोरे. उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे. क्रीडा विभाग प्रमुख मोहनीश देशमुख या स्पर्धेसाठी यांचा विशेष सहकार्य लाभलं या स्पर्धेसाठी पंच म्हणून ज्यांनी काम केलं ते आनंत चाळके, सूर्यकांत गर्दे,राजेश पाटील, शरद जाधव, काजल भाकरे,स्वप्नील पाटील, देवदत्त भोईर, विनायक कारभारी, अभिजित गुरव, जितेंद्र यादव,राजेश शिर्के, विशाल मुळे, अमोल कडूसकर, कमलाकर घोडविंदे, प्रशांत धुमडे, जितेंद्र यादव, सुश्मिता देशमुख यांचे विशेष सहकार्य मिळालं  तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी तसेच क्रीडा विभागाचे  विद्यार्थी देखील मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश लकडे व प्रा. विजय सोनार यांनी केले.अशा या आनंदमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.

No comments:

Post a Comment

Pages