औरंगाबाद :
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भडकलगेट येथे रिपब्लिकन विद्यार्थी सेना व मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 147 रक्तदात्यानी रक्तदान करून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले उपक्रमाचे हे 9 वे वर्ष होते.
एच डी एफ सी बँकेच्या वतीने रक्तदात्यांना प्रोत्साहन पर भेटवस्तू देण्यात आल्या तर शिक्षणमहर्षी माधवराव बोरडे प्रतिष्ठान च्या वतीने सर्व रक्तदात्यांना संविधान प्रस्ताविकेच्या प्रति भेट देण्यात आल्या तर अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथील रक्तपेढी च्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले.
नागसेनवनातील विविध महाविद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी रक्तदानात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
यावेळी पोलीस आयुक्त श्री. प्रवीण पवार, पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, पोलीस निरीक्षक मनोज जगताप, दौलतराव मोरे, मिलिंद दाभाडे, कृष्णा बनकर, संजय जगताप, राजू अमराव, संदिप शिरसाठ,प्रा.देवानंद वानखेडे, डॉ अनिल पांडे, मुन्नाभाऊ बोरडे, प्रशांत इंगळे, प्रा.सिद्धोधन मोरे, एच डी एफ सी बँकेचे विशाल कदम, अमोल पाठक, मनोज इंदासराव,हेमंत मोरे,अमित घनघाव, कुणाल राऊत,डॉ.अविनाश सोनवणे, दीपक निकाळजे, अमित दांडगे, पप्पू गीते, रुपराव खंदारे आदींच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी सचिन निकम, प्रा.प्रबोधन बनसोडे, कुणाल भालेराव, अतुल कांबळे, संदिप अहिरे, सिद्धार्थ दिवेकर, गुणरत्न सोनवणे, राष्ट्रपाल गवई, सुमित सुरडकर, प्रा.देवानंद पवार,आदित्य वाहुळ, शैलेंद्र म्हस्के, अमित दांडगे, राष्ट्रपाल गवई,आदि बनसोडे, पवन पवार,विकास रोडे,नितीन निकम, किशोर लोखंडे, आकाश साबळे,सुमित घोरपडे, अक्षय रगडे,प्रसेनजीत गायकवाड, सुमित नावकर, रत्नदीप रगडे, मंथन गजहंस,अक्षय शेजुळ,पियुष बनसोडे, आशिष बनकर, प्रवीण हिवराळे, सतीश शिंदे, प्रा.समाधान निकम, यांनी परिश्रम घेतले.प्रा.विलास लिहणार, प्रा.विशाल वाघ आदींनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment