महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या ६८ व्या महापरिनिर्वाणदिनी रिपाइंतर्फे अभिवादन सभा - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 3 December 2024

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या ६८ व्या महापरिनिर्वाणदिनी रिपाइंतर्फे अभिवादन सभा - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले


मुंबई दि. ३ -  भारतीय संविधानाचे शिल्पकार  महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त  दि.६ डिसेंम्बर रोजी सायंकाळी ५ वाजता  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले) पक्षातर्फे  जाहीर  अभिवादन सभा छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे  आयोजित करण्यात आली आहे.  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करणाऱ्या  रिपाइं तर्फे आयोजित जाहीर सभेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे सभाध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार  आहेत. तसेच रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य कमिटी आणि राष्ट्रीय कमिटी चे पदाधिकारी, देशभरातील रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्यातील महायुती मधील मित्र पक्षांचे नेते प्रतिनिधी  या अभिवादन सभेस उपस्थित राहणार आहेत अशी माहिती रिपाइं चे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी दिली आहे.


महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त दरवर्षी रिपाइं तर्फे छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करणाऱ्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात येते.दरवर्षी प्रमाणे यंदा ही रिपाइं तर्फे  महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी  विनम्र अभिवादन करणाऱ्या जाहीर सभेचे केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेत आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती रिपाइं चे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी  दिली आहे.



No comments:

Post a Comment

Pages