किनवट :आपल्या परिसरातील उज्वल आशा संस्कृतीला नवलेखकानी शब्दबद्ध करावे, शेतामध्ये राब-राब राबणाऱ्या कष्टकऱ्यांचे जीवन साहित्यातून पुढे यावे, जगणं आणि व्यवहार हे साहित्यातून मांडून सशक्त साहित्य निर्मिती करावे, असे मत बळीराम पाटील महाविद्यालयात 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा', या कार्यक्रमाच्या निमित्ताने लेखक - वाचक संवाद या अभिनव उपक्रमामध्ये प्रसिद्ध कवी महेंद्र नरवाडे यांनी केले. प्रारंभी थोर समाज सुधारक स्मृतीशेष बळीराम पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. के. उपप्राचार्य डॉ. पंजाब शेरे प्रसिद्ध कवी रामस्वरूप मडावी, प्रा.डॉ.आनंद भालेराव विचार मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलताना महेंद्र नरवाडे म्हणाले की, आपल्या परिसरातील विविध कला संस्कृती लेखक आणि कवी यांचा सुद्धा अभ्यास करावा. आपल्या परिसरातील वंचिताचे दुःख हे साहित्यातून मांडावे, असे सांगून कवी नरवाडे यांनी स्वरचित कविता सादर करून मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी लेखक म्हणून आदिवासी उज्वल संस्कृतीचा ठेवा हे आपण जतन करून ठेवला पाहिजे मातीमध्ये रुजलेले बियाणे जसे आनंदाने डोलते तसे विद्यार्थ्यांनी साहित्य नवनिर्मिती करून साहित्यातून आनंद निर्माणव्हावा, असे मत रामस्वरूप मडावी यांनी माडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पंजाब शेरे यांनी केले. अध्यक्षीय समारोप डॉ. आनंद भालेराव यांनी केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रमाधिकारी प्रा. डी. टी. चाटे, डॉ. शुभांगी दिवे, प्रा मंदाकिनी राठोड, डॉ. रत्नाकर यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. शेषराव माने यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. शुभांगी दिवे यांनी मानले.
No comments:
Post a Comment