किनवट : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भारतीय सशस्त्र सेना विषयी माहिती व्हावी, शिस्त, मेहनत, चिकाटी या जीवन मूल्यांची जोपासना व्हावी याकरिता कमठाला केंद्रांतर्गत जिल्हा परिषद लोणी(ता.किनवट)शाळेची शैक्षणिक सहल सैनिक स्कूल चंद्रपूर येथे नुकतीच नेण्यात आली होती तेथील देशभक्ती वातावरण पाहून विद्यार्थी प्रेरीत झाले.
संपूर्ण भारता मध्ये असलेल्या एकूण ३३ सैनिकी शाळा पैकी अत्याधुनिक सुविधापूर्ण, गुणवत्ता पूर्ण शाळा म्हणून महाराष्ट्रा मधील सैनिक स्कूल, चंद्रपूर येथे संपूर्ण भारतातील विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवेशित होतात. भारतीय सशस्त्र सेनेकरिता गुणवत्ता पूर्ण अधिकारी तयार करण्याचे, एनडीए मधील कॅडेट तयार करण्याचे प्रशिक्षण याठिकाणी शालेय विद्यार्थी दशेपासून देण्यात येते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भारतीय सशस्त्र सेने विषयी माहिती व्हावी, शिस्त, मेहनत, चिकाटी या जीवन मूल्यांची जोपासना व्हावी याकरिता लोणी शाळेचे विद्यार्थी यांची एकदिवसीय क्षेत्रभेट सैनिक स्कूल, चंद्रपूर येथे नेण्यात आली होती.
भारतीय नौसेनेतील शाळेचे प्रिसिपल कॅप्टन आश्विन अनुपदेव यांनी ग्रामीण भागातील मुले सशस्त्र सेनेतील सेवेची माहिती बाळगतात, सैनिक शाळांना भेटी देतात हे पाहून लोणी शाळेचे विशेष कौतुक केले, शाळेतील विद्यार्थ्यांना वेळ देऊन मार्गदर्शन केले. सैनिक शाळेचे एडमीन ऑफिसर लेफ्टनंट कर्नल जी. राजनाथ ह्यांनी सुधा मुलांशी संवाद साधला. यावेळी शाळेतील विद्यार्थीनी मंत्रा सुशिल गुंजकर हिने सैनिक शाळेविषयी मनोगत व्यक्त केले. लोणी शाळेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतीमा भेट देण्यात आली.
शाळेतील सर्व शैक्षणिक प्रक्रिया कशी चालते याविषयी शाळेचे सर्व कॅम्पस दाखविण्याची व्यवस्था शाळेतील प्रिन्सिपॉल यांनी करवून दिली. सैनिक शाळा चंद्रपूर येथील श्री. येजरे यांनी सोबत राहून संपूर्ण शाळेविषयी माहिती दिली. शाळेतील कॅडेट्स विद्यार्थी यांची शिस्त, शाळेची खेळांची क्रीडांगणे, ग्रंथालय, वैज्ञानिक प्रयोगशाळा, शाळेचे विशेष वैशिष्ट्य असलेले भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळख असलेले भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम म्युझियम, भारतीय नौसेना, वायुसेना, आर्मी यांचे म्युझियम पाहून विद्यार्थी प्रेरित झाले.
चंद्रपूर येथील बोटोनिकल गार्डन येथेही लोणी शाळेतील विद्यार्थ्यांनी भेट दिली. वैज्ञानिक सिद्धांतावर आधारित वेग वेगळ्या भौमितिक रचना विद्यार्थ्यांनी हाताळून पाहिल्या. बोटनिकॅल गार्डन येथील निसर्गरम्य मोठा परिसर, क्षेपणास्त्र , जहाज यांच्या प्रतिकृती पाहून विद्यार्थ्यांनी आनंद सह ज्ञांनार्जन सुद्धा केले. एकूणच शाळेची एकदिवसीय सहल अतिशय उत्साही वातावरणात व देशप्रेरणेने संपन्न झाली. याकामी शाळेचे मुख्याध्यापक रमेश मुनेश्वर यांचे नेतृत्वात विद्या श्रीमेवार, अंकुश राऊत, राहूल तामगाडगे सहशिक्षक तसेच शालेय पोषण आहार कर्मचारी जयश्री बादड यांनी सहकार्य केले. माता पालकांच्या सहमतीने आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे सहल यशस्वी झाली.
No comments:
Post a Comment