२७ व्या दीक्षान्त समारंभासाठी ‘स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ सज्ज ; राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेत गुणवंतांचे पदवीदान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 28 January 2025

२७ व्या दीक्षान्त समारंभासाठी ‘स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ सज्ज ; राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेत गुणवंतांचे पदवीदान

नांदेड दि. २८ जानेवारी : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा २७ दीक्षान्त समारंभ २९ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वा. विद्यापीठाच्या दीक्षान्त मंचावर पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होणार आहे. 


    नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी उपाध्यक्ष व पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्रख्यात प्रा. भूषण पटवर्धन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, व्यवस्थापन परिषदचे सर्व सदस्य यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती असणार आहे. असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी.डी. पवार आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांनी कळविले आहे.


   याप्रसंगी विद्यापीठातून सर्वाधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यास नांदेड चान्सलर सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षी हा बहुमान परभणी येथील बी. रघुनाथ आर्टस, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालयाची विद्यार्थींनी कु. श्रद्धा हरहरे यांना मिळणार आहे.. श्रध्दा हरहरे यांना राज्यपाल महोदयांच्या हस्ते सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय इतरही ५१ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देवून सन्मानित करण्यात येणार आहे. 


     सत्ताविसाव्या दीक्षान्त समारंभानिमित्त विद्यापीठ परीक्षेत्रातील चारही जिल्ह्यातील एकूण २१०५५ विद्यार्थ्यांना यावर्षी पदवी, पदविका  प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यामध्ये १८० विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रमाणपत्र दीक्षान्त समारंभाच्या दुपारच्या सत्रात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.


हा दीक्षान्त समारंभ यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक समिती आप-आपली कार्य पूर्ण करीत परिश्रम घेत आहेत.

No comments:

Post a Comment

Pages