बाबासाहेबांची पत्रकारिता आजही आदर्श - डॉ. मिलिंद आठवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 1 February 2025

बाबासाहेबांची पत्रकारिता आजही आदर्श - डॉ. मिलिंद आठवले


छत्रपती संभाजीनगर : येथील साकेत बुद्ध विहार समिती व फुले शाहू आंबेडकर राईट स्टडी सर्कलच्या वतीने 105 व्या मूकनायक वर्धापन दिनाच्या निमित्ताने मूकनायक :डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता याविषयावर आंबेडकरी विचारांचे अभ्यासक डॉ.मिलिंद आठवले यांचे व्याख्यान आयोजित केले होते. याप्रसंगी  फुले शाहू आंबेडकर राईट स्टडी सेंटरचे संचालक बी. बी. मेश्राम अध्यक्ष होते, उदघाटक माध्यम समीक्षक प्रा.बुध्दभूषण जाधव होते,इंजिनिअर भास्कर म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 80 व्या वैचारिक प्रबोधन कार्यक्रमांतर्गत मूकनायक -डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता, या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. मिलिंद आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेवर प्रकाश टाकताना सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक च्या माध्यमातून सर्वसामावेशक पत्रकारिता केली, शेती, शेतीचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणी प्रश्न, महिलांचे हक्क, अधिकार जबाबदारीने व गांभीर्याने मांडले,दुर्बल व दुर्लक्षित घटक यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपली लेखणी उपयोगात आणली, आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता आदर्श आहे व पुढीक अनेक पिढ्यांसाठी दिशादर्शक आहे, बाबासाहेबांनी सर्व प्रकारचे विषय, सर्व घटकांचा आवाज मूकनायक मधून पुढे आणला,असेही डॉ. आठवले यांनी यावेळी सांगितले, याप्रसंगी संप्रेषणनायक:डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा  ग्रंथ डॉ. आठवले यांनी साकेत बुद्ध विहाराच्या वाचनालयाला सस्नेह भेट दिला! याप्रसंगी फुले शाहू आंबेडकर राईट स्टडी सेंटरचे संचालक अध्यक्ष आयु. बी. बी. मेश्राम यांनी अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रकारितेचा संपूर्ण प्रवास मांडला,साकेत बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष इंजि. भास्कर म्हस्के यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले,पाहुण्यांचा परिचय मधुकर साळवे यांनी करून दिला,धनराज गोंडाणे, ऍड. विलास रामटेके, भीमराव गाडेकर, मिसाळ साहेब, ठोकळ साहेब यांनी व इतर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले,प्रास्ताविक प्रा. सुनील दाभाडे यांनी केले,सूत्रसंचालन प्रा. मंगला झिने यांनी केले,प्रा. रामप्रसाद डोंगरे  यांनी आभार मानले, यावेळी साकेत बुद्ध विहार समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, साकेत नगर येथील रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.धम्मपालन गाथेने कार्यक्रम संपन्न झाला.

No comments:

Post a Comment

Pages