विद्यार्थ्यांना सुविधा पुरवा; महाविद्यालयातील टवाळखोरांना आवर घाला रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची वसंतराव नाईक महाविद्यालय प्रशासनाकडे मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday, 1 February 2025

विद्यार्थ्यांना सुविधा पुरवा; महाविद्यालयातील टवाळखोरांना आवर घाला रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची वसंतराव नाईक महाविद्यालय प्रशासनाकडे मागणी

छ. संभाजीनगर दि.२७ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा पासून वंचित ठेवण्यात येत असून सुरक्षेच्या दृष्टीनेही महाविद्यालयात प्रशासन हे अत्यंत निष्काळजीपणाने वागत असल्याचा आरोप करून रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे सचिन निकम यांनी वसंतराव नाईक महाविद्यालय प्रशासनाला धारेवर धरत विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे. 


याबाबत त्यांनी प्राचार्य डॉ.संजय शिंदे यांना निवेदन सोपविले असून आपले महाविद्यालय हे अनुदानित महाविद्यालय आहे शिवाय सर्व सुविधा पुरविणे आपणास बंधनकारक आहे विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधांसाठी शासनाचे विविध अनुदान देखील आपणांस मिळत असतांना पिण्याचे पाणी, शौचालय अश्या मूलभूत सुविधा पुरविण्यास महाविद्यालय प्रशासन अपयशी ठरले असल्याने विद्यार्थ्यांना असुविधेचा सामना करावा लागत आहे याकडे लक्ष वेधले.

       दि.२६ डिसेंबर रोजी आपल्या महाविद्यालयाच्या प्रांगणात एका विद्यार्थ्याला टवाळखोर तरुणांनी बेदम मारहाण केली तसेच त्याचे चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारालाही बेदम मारहाण करण्यात आल्याने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे परंतु त्यावर अंकुश निर्माण करण्यात आपण अयशस्वी ठरला हे गंभीर असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार असा सवाल उपस्थित केला आहे.

महाविद्यालयात सतत बाहेरील टवाळखोरांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने विद्यार्थी भयभीत झालेले आहेत महाविद्यालयाच्या दोन्ही प्रवेशद्वारातून थेट टवाळखोर येजा करत असतात तेथे सुरक्षा रक्षकही नेमण्यात आलेला नाही,

महाविद्यालयात शौचालय, पिण्याचे पाणी, जेवणासाठीची जागा नसल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयाबाहेर जावे लागते. महाविद्यालयात उपहारगृह देखील नसल्याने नाश्ता, चहापाण्यासारखी सुविधा देखील उपलब्ध होत नसल्याने या समस्या तात्काळ सोडवाव्यात असे सांगत विद्यार्थ्यांना किमान मूलभूत सुविधा पुरवून सुरक्षेच्या दृष्टीने ठोस उपाययोजना कराव्यात अन्यथा रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने या विरोधात लोकशाही मार्गाने अवलंब करण्यात असा इशारा दिला आहे.

No comments:

Post a Comment

Pages