उद्यानाच्या आरक्षित जागेवर उद्यान किंवा शासकिय रुग्णालय उभारावे: माजी नगराध्यक्ष इसाखान यांची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday, 24 February 2025

उद्यानाच्या आरक्षित जागेवर उद्यान किंवा शासकिय रुग्णालय उभारावे: माजी नगराध्यक्ष इसाखान यांची मागणी


किनवट,ता.२४ : नगरपरिषद हद्दीतील सुभाष नगर येथे उद्यानासाठी आरक्षित असलेल्या ०.७८ आर क्षेत्रावर अतिक्रमण होऊन ते क्षेत्र हाडप होण्याची शक्यता असल्याने त्या संपूर्ण क्षेत्राला संरक्षण भिंत बांधून त्या जागेवर उद्यान किंवा शासकिय रुग्णालय उभारावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष इसा खान सरदार खान यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे .

      निवेदनात नमूद केले आहे की , नगरपालिका क्षेत्रातील सुभाष नगर येथील नगरपालिकेची शेत भू क्रमांक २५८ मधील ०.७८ आर मोकळी जागा ही उद्यानासाठी आरक्षित असून नगरपालिकेच्या डीपी प्लॅनवर या जागेची नोंद आहे. सदर क्षेत्र हे मागील कित्येक वर्षापासून खुले असल्यामुळे या जागेचा वापर उद्यानासाठी किंवा इतर सार्वजनिक प्रयोजनासाठी होत नसल्यामुळे या जागेवर भूखंड माफियाचे लक्ष आहे. काही वर्षापूर्वी एका भूखंडमाफियांने सदर मोकळ्या जागेवर अतिक्रम करून ती स्वतःच्या मालकीची असल्याची दाखविण्याचा प्रयत्न केला. 

     नगरपालिका प्रशासन ही जागा संरक्षित करण्यास दुर्लक्ष करत असल्यामुळे कोणत्याही क्षणी भूखंड माफिया या जागेवर बेकायदेशीर ताबा करून ती जागा हडप करण्याची शक्यता आहे. नगरपालिकेच्या डीपी प्लॅन नोंदीनुसार शेत भू. क्र. २५८  मधील ०.७८ आर एवढे क्षेत्र हे उद्यानासाठी आरक्षित असल्यामुळे या जागेवर कोणी बेकायदेशीर ताबा करू नये यासाठी त्वरित ०.७८ आर या मोकळ्या जागेला संरक्षण भिंत बांधून संरक्षित करावे व तेथे उद्यान किंवा  शासकीय दवाखाना उभारण्याची कारवाई करावी. 

   निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट, तहसीलदार, किनवट व मुख्याधिकारी नगर परिषद, किनवट यांना देण्यात आल्या आहेत.


No comments:

Post a Comment

Pages