मोहनअण्णा हंबर्डे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यास युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - स्वप्निल इंगळे पाटील - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 25 February 2025

मोहनअण्णा हंबर्डे यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यास युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे - स्वप्निल इंगळे पाटील

नांदेड, प्रतिनिधी : 

      येत्या २८ फेबुवारी रोजी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय नेते तथा नांदेड दक्षिणचे मा. आमदार मोहनअण्णा हॅंबर्ड यांचा त्यांच्या असंख्य

समर्थकासह राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मा.खा सुनील तटकरे साहेब तथा जिल्हाचे नेते लोहा कंधार मतदार संघाचे आमदार मा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतुत्वाखाली प्रवेश करणार आहेत.

   आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद,पंचायत समिती व अन्य स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीच्या बांधणीसाठी युवकांनी युवकांची संपूर्ण ताकद राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा मागे उभी करावी . राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आजपर्यंत अनेक जातीधर्मातील युवकांना पक्ष संघटनेत स्थान देत असताना च अनेक सामान्य कुटुंबातील युवकांना आमदार ते मंत्री केल आहे म्हणून आगामी काळातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत युवकांनी आपली संपूर्ण ताकद राष्ट्रवादी पक्षाच्या मागे उभी करावी असे आवाहन राष्ट्रवादी युवक कांग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष तथा राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेसचे 

मा जिल्हा अध्यक्ष इंजी स्वप्निल इंगळे पाटील यांनी केले आहे. तसेच २८ फेबुवारी रोजी ओम गार्डन नांदेड येथील पक्षसोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages