नांदेड :- तत्कालीन नांदेड नगरपालिका व वाघाळा नगरपालिकेचे एकत्रिकरण करुन दिनांक 26 मार्च 1997 रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका स्थापण करण्यात आली.त्यानुषंगाने त्याअनुषंगाने बुधवार दिनांक 26.03.2025 रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका *28 वा वर्धापन दिन* *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे* यांच्या पुढाकाराने तसेच *पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार व मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली* यांच्या प्रमुख उपस्थितीत तर *जिल्हाधिकारी राहुल कर्डीले* यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील सर्वसाधारण सभागृह येथे थाटात संपन्न झाला.
आजच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन महापालिका कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांसाठी हिरकणी कक्षाचे उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या अत्यावश्यक सेवेत असलेल्या पाणीपुरवठा, मलनिस्सारण व स्वच्छता विभागासाठी 03 नविन युटिलिटी वाहनांचे उदघाटन मा.पोलीस अधिक्षक यांच्या हस्ते पार पाडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वृक्ष गणना अहवाल प्रसिध्दी सोबतच महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत महापालिकेच्या 28 ऑनलाईन सेवांचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पार पाडण्यात आला.त्याचवेळी मान्यवरांच्या हस्ते Officer of the month व Employee of the month या पुरस्कारासह उत्कृष्ट आशा स्वंयसेविका पुरस्कार आणि महिला दिना निमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्या महिलांना पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना आयुक्तांनी नगरपालिका काळ ते महानगरपालिका स्थापनेपासुन ते आजपर्यंतच्या प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या 28 व्या वर्धापन दिनानिमित्त मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा व्यक्त करुन शहरातील नागरीकांना मुलभुत नागरी सेवा अधिक सक्षमपणे पुरविण्यासाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन यावेळी मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी केले.तसेच महापालिकेच्या 28 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन महापालिका प्रशासना मार्फत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमा अंतर्गत महापालिकेच्या 28 ऑनलाईन सेवांचा शुभारंभ करुन महिलांसाठी हिकरणी कक्षाची स्थापणा केल्याबद्दल समाधानी असल्याचे यावेळी आयुक्तांनी सांगितले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली व पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी मनागेत व्यक्त करतांना महानगरपालिकेच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करत महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात उत्तरोउत्तर प्रगती होत जावी असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी याप्रसंगी महाराष्ट्र शासनाने ठरवुन दिलेल्या 100 दिवस कृती कार्यक्रमा अंतर्गत महापालिके मार्फत होत असलेली कामे ही कौतुकास्पद असल्याचे यावेळी त्यांनी नमुद करुन महानगरपालिकेच्या वर्धापन दिना निमित्त उपस्थित मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच महानगरपालिका प्रशासना मार्फत राबविण्यात येत असलेले वृक्ष लागवडीसारखे उपक्रम हे प्रेरणादायी असल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री गिरीश कदम, उपआयुक्त सुप्रिया टवलारे, स.अजितपालसिंघ संधु, सहा.संचालक नगरचनाकार पवन आलुलकर, नगररचनाकार पवार, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता विश्वनाथ स्वामी, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी सदाशिव पतंगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.सुरेशसिंह बिसेन, मुख्य उद्यान अधिक्षक डॉ.मिर्झा बेग, मालमत्ता विनियोग अधिकारी गुलाम सादेक, क्रिडा व सांस्कृतिक अधिकारी रमेश चवरे, उपअभियंता सतिश ढवळे, प्रकाश कांबळे, दिलीप टाकळीकर, क्षेत्रिय अधिकारी रावण सोनसळे, गौतम कवडे, राजेश पाटील व इतर विभाग प्रमुखांची व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महापालिकेचे वरीष्ठ लिपीक श्री सुमेध बनसोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी केले.
1) महापालिकेच्या 28 ऑनलाईन सेवा जसे की, नव्याने कर आकारणी, पन:कर आकारणी, मालमत्ता हस्तांतर नोंद प्रमाणपत्र,कर माफी मिळणे, स्वयं मुल्यांकन, कराची मागणीपत्र तयार करणे, थकबाकी नसल्याचा दाखला देणे, अग्निशमन ना हरकत दाखला देणे, अग्निशमन ना हरकत दाखला नूतनीकरण, नवीन जाहिरात/ आकाशचिन्ह परवाना व नवीन परवाना व नुतनीकरण, वृक्षतोड परवानगी देणे, शुश्रृषा गृह परवाना देणे, शुश्रृषा गृह परवान्याचे नुतनीकरण, शुश्रृषा परवाना धारक / भागीदाराचे नांव बदलणे, झोन दाखला देणे, भाग नकाशा देणे, वृक्ष तोड परवानगी इत्यादी सेवांचा शुभांरभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
2) महिला हिरकणी कक्षाचे उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्य हस्ते करण्यात आले.
3) पाणी पुरवठा, मलनिस्सारण व स्वच्छता विभागासाठी एकुण 03 युटिलिटी वाहनांचे उदघाटन पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.
4) मान्यवरांच्या हस्ते माहे जानेवारी 2025 साठी ऑफिसर ऑफ द मंथ म्हणुन डॉ.मो.बदीयोद्यीन मो.बहाओद्यीन,वैद्यकीय अधिकारी यांना तर माहे फेब्रुवारी 2025 साठी प्रकाश ग्यानोबा कांबळे, विभाग प्रमुख, प्रधानमंत्री आवास योजना यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
5) त्याचप्रमाणे माहे जानेवारी 2025 साठी एम्प्लॉई ऑफ द मंथ म्हणुन वसंत दिगांबर कल्याणकर, वसुली पर्यवेक्षक यांना तर माहे फेब्रुवारी 2025 साठी संजय बाळकृष्ण कुलकर्णी, वरीष्ठ लिपीक, लेखा विभाग व वर्षा कामाजी सोनटक्के, लिपीक, प्रधानमंत्री आवास योजना यांना संयुक्तपणे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
6) आशा स्वंयसेविका यांना उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल व महिला दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेता महिलांना पुरस्थकराचे वितरण करण्यात आले.
No comments:
Post a Comment