नांदेडमध्ये ५ जून रोजी भव्य ‘बौद्ध विवाह मेळावा २०२६’; वधू-वर नोंदणीसाठी आवाहन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday, 19 April 2026

नांदेडमध्ये ५ जून रोजी भव्य ‘बौद्ध विवाह मेळावा २०२६’; वधू-वर नोंदणीसाठी आवाहन

 नांदेडमध्ये ५ जून रोजी भव्य ‘बौद्ध विवाह मेळावा २०२६’; वधू-वर नोंदणीसाठी आवाहन

नांदेड :  पंचशिल प्रतिष्ठाण, नांदेड यांच्या  ‘बौद्ध विवाह मेळावा नांदेड-२०२६’ चे आयोजन शुक्रवार, ५ जून २०२६ रोजी दुपारी १२:२५ वाजता चांदोजी पावडे मंगल कार्यालय, डी-मार्ट रोड, नांदेड येथे करण्यात आले आहे. हे मेळाव्याचे चौथे वर्ष आहे. नांदेड शहर व जिल्ह्यातील उपवर मुला-मुलींसाठी हा मेळावा सामाजिक बांधिलकी, पारदर्शकता आणि शिस्तबद्ध नियोजनाच्या माध्यमातून भव्य स्वरूपात पार पडणार आहे.

    बौद्ध समाजातील ज्येष्ठ, अनुभवी सामाजिक कार्यकर्ते, धम्म चळवळीतील महिला-पुरुष तसेच विविध समित्यांच्या सहकार्याने हा विवाह मेळावा आयोजित करण्यात येत असून, नांदेड जिल्हा कार्यकारिणीने समाजबांधवांना वधू-वरांची जास्तीत जास्त नोंदणी करून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

या मेळाव्याची परंपरा यशस्वी ठरत असून २०२३ मध्ये १९ जोडपी, २०२४ मध्ये २७ जोडपी, तर २०२५ मध्ये २९ जोडपी विवाहबद्ध झाली होती. या विवाह सोहळ्यांची पारदर्शक, शिस्तबद्ध आणि थाटामाटातील अंमलबजावणीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात या उपक्रमाची चर्चा झाली होती. यंदाही त्याच उत्साहात आणि अधिक व्यापक स्वरूपात मेळावा होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

     नोंदणी शुल्क वधूसाठी ३,००० रुपये, तर वरासाठी ४,००० रुपये निश्चित करण्यात आले आहे. इच्छुकांनी आपल्या ओळखीतील वधू-वरांची नोंदणी करून या उपक्रमाची जनजागृती करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.या मेळाव्यासाठी अध्यक्ष इंजी. अशोकराव येरेकर, सचिव इंजी. आर. बी. मादळे, संयोजक भरतकुमार कानिंदे, निमंत्रक भगवानराव धबडगे, कोषाध्यक्ष अॅड. गौतमराव कांबळे यांच्यासह पुरुष व महिला समितीतील शेकडो कार्यकर्ते तयारीत सहभागी झाले आहेत.

    वधू-वर नोंदणीसाठी प्रमुख संपर्क:

उपा. गणपतराव गायकवाड – 9527881901

उपा. सा. ना. भालेराव – 9850052125

उपा. विजय रावळे – 9421839668

उपा. साहेबराव पुंडगे – 9921131645

आयोजकांनी समाजातील युवक-युवती, पालक आणि समाजबांधवांनी या ऐतिहासिक उपक्रमाला सहकार्य करून ‘बौद्ध विवाह मेळावा नांदेड-२०२६’ यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages