भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव ७ ते १४ एप्रिल दरम्यान कार्यक्रम ; -वाचन सप्ताह, ग्रंथ महोत्सव, आंबेडकरी जलसा, रक्तदान शिबिरासह भरगच्च कार्यक्रम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 3 April 2025

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव ७ ते १४ एप्रिल दरम्यान कार्यक्रम ; -वाचन सप्ताह, ग्रंथ महोत्सव, आंबेडकरी जलसा, रक्तदान शिबिरासह भरगच्च कार्यक्रम

  छत्रपती संभाजीनगर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त ७ ते १४ एप्रिल दरम्यान वाचन सप्ताह, ग्रंथ महोत्सव आंबेडकरी जलसा, रक्तदान शिबिरासह भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


   मा.कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या महोत्सवाची सुरुवात ७ एप्रिल रोजी ’वाचन सप्ताह’ उद्घाटनाने करण्यात येईल. यावेळी 'प्रतिष्ठान'चे संपादक, कवी प्रा श्रीधर नांदेडकर यांचे 'वाचन संस्कृती' या विषयावर व्याख्यान होईल. तर ८ एप्रिल रोजी ’काव्यवाचन’ स्पर्धा घेण्यात येणार आहे. ९ एप्रिल रोजी 'रक्तदान' शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना सह सर्व कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी सहभागी होणार आहेत. ११ एप्रिल रोजी क्रांतीसूर्य महात्मा फुले जयंतीनिमित्त प्रा.राहुल कोसंबी यांचे सकाळी ११ वाजता महात्मा फुले सभागृहात व्याख्यान होणार आहे. याच दिवशी ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल. इतिहास वस्तुसंग्रहालयाच्या हिरवळीवर होणा-या या महोत्सवात मराठी, हिंदी व इंग्रजी व ऊर्दु भाषेतील नामवंत प्रकाशन संस्था सहभागी होत असून या पुस्तकाचे प्रदर्शन व विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ’मेळा पुस्तकांचा...समृद्ध वाचन संस्कृतीचा’ हे ग्रंथ महोत्सवाचे ब्रिद असून पहिल्यांदाच विद्यापीठात अशा प्रकारचा ग्रंथ महोत्सव होत आहे. १२ एप्रिल रोजी ’आंबेडकरी जलसा’ होणार आहे. यामध्ये युवा महोत्सवातील ’टॉप पाईव्ह’ संघ सादरीकरण करणार आहेत. याच दिवशी ’सलग १८ तास वाचन’ हा उपक्रम ज्ञानस्त्रोत केंद्राच्या वाचन कक्षात राबविण्यात येणार आहे. तर १३ एप्रिल रोजी प्रख्यात शाहीर नंदेश उमप यांच्या शाहीरीचा कार्यक्रम नाट्यगृहात होईल. या महोत्सवाचा समारोप भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी १४ एप्रिल रोजी होणार असून. या दिवशी सकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक काढण्यात येणार आहे. विद्यापीठ गेटपासून ही मिरवणूक ११ वाजता नाटयगृहात पोहोचेल. यानंतर मुंबई विद्यापीठातील डॉ.वंदना महाजन यांचे ’फुले-आंबेडकरी विचार आणि स्त्री प्रश्न’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. महोत्सवाची जय्यत तयारी विद्यापीठ प्रशासनाने सुरु केली आहे. या महोत्सवासाठी विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, ज्ञान स्त्रोतकेंद्र, आरोग्य केंद्र, महात्मा फुले प्रतिष्ठान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र आदी सहभागी होणार आहेत. या सोहळयाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.


भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव


डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवानिमित्त ७ ते १४ एप्रिल दरम्यान पुढील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


सोमवार, दि.७ - ’वाचन सप्ताह’चे उद्घाटन (ग्रंथालय), सकाळी ११ वाजता.

              - प्रा श्रीधर नांदेडकर यांचे 'वाचन संस्कृती'वर व्याख्यान  


मंगळवार, दि.८ - 'काव्यवाचन’ स्पर्धा (ग्रंथालय), सकाळी ११ वाजता.


बुधवार, दि. ९ - 'रक्तदान’ शिबिराचे आयोजन (ग्रंथालय), सकाळी ११ वाजता.


शुक्रवार, दि. ११ : महात्मा फुले जयंतीनिमित्त प्रा.राहुल कोसंबी यांचे व्याख्यान (महात्मा फुले सभागृह)- सकाळी ११ वाजता.

              - ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन (इतिहास वस्तुसंग्रहालय), सकाळी ११ वाजता.


शनिवार, दि. १२ : 'आंबेडकरी जलसा’ ( नाट्यगृह)

             - 'सलग १८ तास वाचन’ (ज्ञानस्त्रोत केंद्र वाचन कक्ष)


रविवार, दि. १३ - शाहीर नंदेश उमप यांच्या शाहीरीचा कार्यक्रम (नाट्यगृह)- सायंकाळी ६ वाजता.


सोमवार, दि.१४:  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती

        -डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक - विद्यापीठ गेट, सकाळी ८ वाजता.

       - डॉ.वंदना महाजन यांचे व्याख्यान (नाट्यगृह) - सकाळी ११ वाजता.

No comments:

Post a Comment

Pages