मुंबई -(प्रतिनिधी) समाजातील आर्थिक दुर्बल व आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणा-या महामानव प्रतिष्ठान व एक वही एक पेन अभियानने यंदाची "भीमजयंती" शैक्षणिक उपक्रम राबवून साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
महापुरुषांच्या जयंती ,महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरीनिर्वाण दिन , सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती तसेच मान्यवर व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त लाखो रूपयांचा खर्च केला जातो.यातील काही अनावश्यक खर्चाला फाटा देवून समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावणे,विद्यार्थी दत्तक घेणे,विनामूल्य,एमपीएससी ,युपीएससी क्लासेस चालवणे,शाळांमध्ये तसेच वस्त्यांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक प्रवासाविषयी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेणे त्याचप्रमाणे शक्य आहे असे समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे आवाहन महामानव प्रतिष्ठान प्रणित एक वही एक पेन अभियानांतर्गत करण्यात येते. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज,महात्मा फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीमाई,राजमाता ,माता जिजाऊ रमाई या महापुरुष व महामातांच्या जयंतीदिनी ,गणेशोत्सवात त्यांना वह्या, पेन, पुस्तके आदी शैक्षणिक वस्तूंनी अभिवादन करावे.असेही आवाहन करण्यात येते . डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देश , विदेश व राज्यभारत महिनाभर साजरी केली जाते. या जयंतीदिनी वह्या पेन पुस्तके दप्तरे ,पुस्तके ,कपडे वापरात नसलेले सुस्थितीतील मोबाइल,लॅपटॉप आदी त्यांच्या पुतळ्याला वाहून अभिवादन करावे संबंधित पुतळा समिती ,मंडळांनी हे शैक्षणिक साहित्य समाजातील आर्थिक दुर्बल आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांना वितरित करावे किंवा 9372343108 या क्रमांकावर संपर्क साधून सुपूर्द करावे असे एक वही एक पेन अभियानचे प्रणेते राजू झनके यांनी महामानव प्रतिष्ठान व एक वही, एक पेन अभियानच्या वतीने केले आहे .
No comments:
Post a Comment