महानगरपालिकेत आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत मान्सुन पुर्व आढावा बैठक संपन्न ; क्षेत्रिय अधिकारी यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आयुक्तांनी दिले निर्देश - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday, 1 April 2025

महानगरपालिकेत आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत मान्सुन पुर्व आढावा बैठक संपन्न ; क्षेत्रिय अधिकारी यांनी विशेष खबरदारी घेण्याचे आयुक्तांनी दिले निर्देश

नांदेड :- नांदेड महानगरपालिके अंतर्गत आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत मान्सुन पुर्व कामांचा आढावा आज दिनांक ०१.०४.२०२५ रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे  यांनी महापालिकेत आयोजित बैठकीत घेतला.


शहरातील विविध भागात अर्धवट कामे झाल्यामुळे पावसाळ्यात सखल भागात पाणी साचुन नागरीकांना होणारी असुविधा टाळण्याच्या दृष्टीकोणातुन प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी तातडीने पुर्ण करणे आवश्यक असल्याचे बैठकीदरम्यान नमुद करण्यात आले. नांदेड शहरातुन वाहणारी गोदावरी नदीची इशारा पातळी ३५४ मीटर असुन धोका पातळी ही ३५४ मीटर आहे. नदीच्या पुरामुळे बाधीत होणाऱ्या घरांची संख्या २७७२ असुन या सर्व रहिवाशांना क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी नोटीसीचे वाटप करण्याबाबत बैठकीत निर्देशीत करण्यात आले.

त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे अथवा नदीच्या पुरपरिस्थितीमुळे शहरातील विविध भाग प्रभावित होत असतात त्यामध्ये प्रामुख्याने झोन क्र.२ अंतर्गत बाबा नगर, हिंगोली गेट, दत्त नगर, शाहु नगर, गोविंद नगर, सादत नगर, तानाजी नगर, मगणपुरा, खोब्रागडे नगर झोन क्र.३ अंतर्गत श्रवस्ती नगर, भिमसंदेश कॉलनी झोन क्र.४ अंतर्गत खकडुपरा, दुल्हेशाह रहमान नगर, बंदाघाट, देगावचाळ, मिमघाट, गोवर्धनघाट, गाडीपुरा, शनिमंदिर, जुना मोढा, शहीदपुरा त्याचप्रमाणे जुन्या नांदेड भागातील झोन क्र.५ अंतर्गत मोमीनपुरा, सिध्दार्थनगर, नावघाट, किल्ला परिसर, कालापुल, करबला, गणीमपुरा, चौफाळा, विणकर कॉलनी, ब्रम्हपुरी, गंगानगर तसेच झोन क्र.६ सिडको अंतर्गत जुना कौठा, साईबाबा परिसर, कौठा, वसरणी इत्यादी भागांमध्ये विशेष खबदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश यावेळी आयुक्तांनी सर्व क्षेत्रिय अधिकारी यांना दिले आहेत.


तसेच शहरात अतिवृष्टीच्या काळात रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी मलेरिया विभागा मार्फत वेळोवेळी फवारणी, पावसाळ्यात नागरीकांना स्वच्छ पाणी पुरवठा, पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे होडींग्स विविध प्रकारचे सुचना फलक पडुन दुर्घटना घडणार नाही त्याच प्रमाणे मनपा हद्दीतील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन नोटीसा बजावण्याच्या सुचना यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर मान्सून पूर्व नियोजनातील सुक्ष्म पध्दतीने छोटे-मोठे नाले, जेसीबी, पोकलेनव्दारे तसेच मनुष्यबळाव्दारे नाले सफाईचे काम दि.३१ मे २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले आहेत.


सदरील बैठकीस अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्यासह उपआयुक्त सुप्रिया टवलारे, स.अजितपालसिंघ संधु, शहर अभियंता सुमंत पाटील, सहा संचालक नगरचनाकार पवन आलुलकर, कार्यकारी अभियंता विश्वनाथ स्वामी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. मिर्झा बेग, सहाय्यक आयुक्त (स्वच्छता) मो. गुलाम सादेक, अग्निशमन अधिकारी के. जी. दासरे, उपअभियंता सतीश ढवळे, प्रकाश कांबळे, दिलीप टाकळीकर, क्षेत्रिय अधिकारी रमेश चवरे, रावण सोनसळे, गौतम कवडे, राजेश जाधव, निलावती डावरे यांची उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment

Pages