भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त 'रन फॉर ईक्वालिटी' स्पर्धेचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 9 April 2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त 'रन फॉर ईक्वालिटी' स्पर्धेचे आयोजन


छत्रपती संभाजीनगर :

शहरातील डॉ. आंबेडकर मेडिकोज असोसिएशन (DAMAA) , ऑल इंडिया डॉक्टर्स फॉर ईक्वॉलिटी अँड एजिटेशन (AIDEA), MSEB इंजिनियर्स असोसीएशन, पी.ई.एस. परिवर्तन ग्रुप अश्या अनेक सामाजिक संगठनांच्या संयुक्त विद्यमाने मागील ६ वर्षांपासून "रन फॉर इक्वालिटी" मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन शहरात करण्यात येते. यावर्षीही दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 


नागसेनवनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मैदानापासून सकाळी ५:५० ला ही स्पर्धा सुरु होईल. ५ किमी (१६ वर्षाखाली मुले व मुली, तसेच १६ वर्षावरील महिला व पुरुष ), १० किमी. (१६ वर्षावरील महिला व पुरुष) असे वयोगट व २ अंतरांचा समावेश आहे. 


या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी www.runforequality.org या संकेत स्थळावर 11 एप्रिलपर्यंत नाव नोंदणी करता येईल. मॅरेथॉन मध्ये सहभागी होण्यासाठी ₹ 134/- दान रुपी घेण्यात येणार असून जमा झालेला पैसा हा गरीब व होतकरू विद्यार्थांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी पूर्णतः वापरण्यात येणार आहे.


आमंत्रित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल व विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसे, ट्रॉफी व सर्टिफिकेट देण्यात येणार आहेत तर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना मेडल्स, एनर्जी ड्रिंक्स व  अल्पोपहार देण्यात येणार आहे. 


समाजात दिवसेंदिवस पसरत चाललेल्या विषमतेच्या वातावरणामध्ये समतेचा विचार रुजविण्याचा संदेश या मॅरेथॉन च्या माध्यमातून देण्यात येणार आहे. 


समाजातील प्रस्थापित जातीभेदाची मानसिकता व सामाजिक अन्यायाला आळा घालण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे अशा संदर्भाची नोंद 'एनहिलेशन ऑफ कास्ट' या साहित्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे. हे प्रेरणास्त्रोत मानूनच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे हे *सातवे* वर्ष आहे. आपल्या शारीरिक आरोग्यासोबतच सामाजिक आरोग्य टिकविण्यासाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन रन फॉर इक्चालिटी टीमच्या वतीने करण्यात आले आहे.


मदतीसाठी संपर्क: अविनाश कांबळे 8888363060, मनीष बागुल 9850554967, राहुल जाधव 9975009756

No comments:

Post a Comment

Pages