ठाकूर श्यामनारायण पदवी महाविद्यालय, कांदिवली येथे 24 एप्रिल रोजी राष्ट्रीय संशोधन ई परिषदेचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 9 April 2025

ठाकूर श्यामनारायण पदवी महाविद्यालय, कांदिवली येथे 24 एप्रिल रोजी राष्ट्रीय संशोधन ई परिषदेचे आयोजन



कांदिवली : आगामी राष्ट्रीय संशोधन परिषदेत सहभागी होण्यासाठी संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि व्यावसायिकांसाठी कांदिवलीच्या ठाकूर श्यामनारायण पदवी महाविद्यालयाने 24 एप्रिल रोजी राष्ट्रीय संशोधन ई परिषदेचे आयोजन  करण्यात आले आहे.


या ई परिषदेचे उद्दिष्ट विविध क्षेत्रातील तज्ञांना एकत्र आणून त्यांचे संशोधन निष्कर्ष शेअर करणे, विचारांची देवाणघेवाण करणे आणि भारतातील अलीकडील घडामोडींवर चर्चा करणे हे आहे. कॉन्फरन्सची मुख्य थीम ट्रान्सफॉर्मिंग भारत: 21 व्या शतकात वाणिज्य, विज्ञान आणि Humanities  यांची भूमिका अशी आहे. 24 एप्रिल 2025 रोजी ऑनलाइन पद्धतीने ही परिषद आयोजित केली जाईल. 

सामाजिक विज्ञान, भाषा, आदरातिथ्य  अभ्यासापासून वाणिज्य, विज्ञान, गणित, माहिती तंत्रज्ञान, कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स  या विषयांपर्यंत  आंतर-विद्याशाखेतील उप-थीम दिलेली आहेत. निवडक शोधनिबंध पीअर रिव्ह्यूड जर्नल,  स्कोपस आणि UGC CARE सूचीबद्ध जर्नलमध्ये प्रकाशित केले जातील. या ई कॉन्फरन्समध्ये प्राध्यापक, रिसर्च स्कॉलर, विद्यार्थी आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होऊ शकतात. 

21 एप्रिल 2025 पर्यंत तुमचा संपूर्ण  रिसर्च पेपर सबमिट करावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. जी. डी. गिरी व CEO श्री राजेश सिंग  यांनी केले. 

या E परिषदेसाठी मुख्य अतिथी   माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, जर्मनीच्या विप्रो प्रा. ली. चे कौशिक चौहान प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. 

अधिक माहितीसाठी, आपण श्री. हार्दिक गोराडीया 8097665698 आणि श्रीमती आभा धोटे 8407958510 यांच्याशी संपर्क साधू शकता. संशोधन लेख conference@tsdcmumbai.in या email वर पाठवावे.

No comments:

Post a Comment

Pages