फुले - आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त शुक्रवारी व सोमवारी प्रबोधनपर व्याख्यानाचे व अभ्यासवर्गाचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 10 April 2025

फुले - आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त शुक्रवारी व सोमवारी प्रबोधनपर व्याख्यानाचे व अभ्यासवर्गाचे आयोजन


किनवट  : शिव-शाहू-फुले-आंबेडकर-अण्णाभाऊ विचारमंच, किनवट तर्फे महात्मा ज्योतीबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती निमित्त शुक्रवारी व सोमवारी (दि.११ व १४ )  साने गुरूजी रुग्णालय सभागृहात प्रबोधनपर व्याख्यानाचे व अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

  शुक्रवारी (दि.११) सायंकाळी ७ वाजता 

 अहिल्यानगरचे प्रसिद्ध विचारवंत डॉ. सुधाकर शेलार यांचे व्याख्यान  आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आनंदराव वाढे हे करणार आहेत ,तर अध्यक्षस्थानी साने गुरुजी रुग्णालयाचे प्रमुख डॉ.अशोक बेलखोडे हे राहणार आहेत.

    सोमवारी (दि.१४) सकाळी १०.३० ते १.३० या वेळेत प्रसिध्द कवी, कादंबरीकार  श्रीकांत देशमुख हे विद्यार्थी व युवकांचा अभ्यासवर्ग घेतील तसेच सायंकाळी ६.०० ते ८.०० या वेळेत व्याख्यान देतील. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार भीमराव केराम हे राहतील,कार्यक्रमाचे उद्घाटन इसा खान, माजी नगराध्यक्ष हे करतील.उपस्थित राहण्याचे आवाहन शिव-शाहू-फुले-आंबेडकर-अण्णाभाऊ विचारमंचच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment

Pages