किनवट शहरात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
किनवट : महात्मा जोतिबा फुले यांची जयंती आज (दि.११) उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीचा मुख्य सोहळा बसस्थानकाजवळील महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ सकाळी ११वाजता संपन्न झाला.यानिमित्त झालेल्या प्रबोधन सभेच्या अध्यक्षस्थानी आमदार भीमराव केराम हे होते.यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात मार्क्स -फुले-आंबेडकर('माफुआ'), चळवळीचे जेष्ठ विचारवंत प्रा.रामप्रसाद तौर यांनी विचार व्यक्त केलेत.
प्रास्ताविक फुले-आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद भरणे यांनी केले.सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले.
मंचावर माजी नगराध्यक्ष के.मुर्ती, आनंदराव वाढे,आनंद मच्छेवार,राम भरणे, किनवट न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष ॲड.किशोर मुनेश्वरb, ॲड.जय खराटे , दादाराव कयापाक , प्रशांत ठमके , प्राचार्या शुभांगीताई ठमके, श्रीनिवास नेम्मानिवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी उपस्थित सर्व मान्यवरांनी महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी, शेषेराव पेटकुले, प्रा.लक्ष्मन पेटकुले, अनिल महामुने, प्रा.दगडु भरकड, अभय महाजन, प्रा.उमाकांत इंगोले, प्रा.शिवदास बोकडे,गिरीष नेम्मानिवार, रमेश बद्दीवार, अजय कदम, उमाकांत क-हाळे, जीवन कोटरंगे , एस.के.राऊत, प्रमोद पोहरकर, संजय सिडाम ,ज्योतिबा गोनारकर ॲड.मिलिंद सर्पे, ॲड.हरीभाऊ दर्शनवाड, माधव कावळे ,फसिउल्ला, नरेंद्र दोराटे, दिगांबर पंडीत, अभय नगराळे , रविकांत सर्पे, बबन वानखेडे, अशोक वासाटे, मारोती सुंकलवाड, उध्दव रामतिर्थकर, दत्ता दोनकेवार, गंगुबाई परेकार, निखिल कावळे, आकाश सर्पे आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment